अर्णव, सुधीर नंतर दीपकला धमक्या; राष्ट्रवादी पत्रकार टार्गेटवर


  • दीपक चौरसियाचे धमक्यांनंतर दोन एफआयआर

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : मुजोर लिबरलची मस्ती थांबायलाच तयार नाही. पालघरच्या सेक्युलर लिंचिंगबद्दल आणि तबलिगी जमातीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार दीपक चौरसियाला आता धमक्या येऊ लागल्या आहेत. दीपकने या विरोधात गौतमबुद्धनगरमध्ये दोन वेगवेगळे एफआयआर नोंदविले आहेत.

पालघर सेक्युलर लिंचिंगबद्दल थेट सोनिया गांधींना प्रश्न विचारल्यानंतर रिपब्लिक नेटवर्कचा मुख्य संपादक अर्णव गोस्वामीला पोलिसी चौकशीला सामोरे जावे लागले. नव्या जुन्या केसचे लचांड त्याच्या मागे लावण्याचे प्रयत्न झाले. तो बधला नाही. त्याच वेळी झी न्यूजचा संपादक सुधीर चौधरी याने जिहादच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल पुराव्यानिशी झी न्यूजवर कार्यक्रम चालवला. त्याच्या विरोधात केरळमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल केला.

आता न्यूज नेशनचा संपादक दीपक चौरसियाला पालघर आणि तबलिगी जमातच्या रिपोर्टिंगवरून टार्गेट करण्यात येत आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून रोज त्याला संपविण्याच्या धमक्या येत आहेत. पालघर प्रकरणानंतर दीपकने अर्णवला पाठिंबा दिला. यानंतर महाराष्ट्रातून धमक्या येण्याचे प्रमाण वाढल्याचे दीपकने
एफआयआरमध्ये आवर्जून नोंदविले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण