अजान देणे इस्लामचा भाग असेलही, पण लाऊडस्पीकरवरून अजानचा ध्वनीप्रदूषणाशी संबंध…!!


  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने ठणकावले

विशेष प्रतिनिधी

अलाहाबाद : अजान देणे हा इस्लामचा अविभाज्य घटक असेलही पण ती अजान लाऊडस्पीकरून देणे, हा धर्माचा भाग असू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

लाऊडस्पीकर द्वारे अजान देणे, इस्लामचा अविभाज्य अंग नाही, असे निरीक्षणही अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. हा नागरी स्वातंत्र्य, ध्वनीप्रदूषण या कक्षेत येणारा विषय आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिका आणि काही पत्रांवर निर्णय देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने निरीक्षणे नोंदवली आहेत की, अजान हा इस्लामचा महत्वाचा आणि अविभाज्य अंग असू शकेल, तरी लाऊडस्पीकर, किंवा अन्य कोणत्याही ध्वनीवर्धक साधनांचा वापर करून अजान देणे, हे धर्माचा अविभाज्य भाग म्हणता येत नाही, त्यास भारतीय राज्यघटनेच्या 25 व्या कलमानुसार संरक्षण नाही, कारण यामुळे नागरिकांच्या व्यवस्था, नैतिकता, आरोग्य आणि इतर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन ठरते.

“त्यामुळे, जोपर्यंत ध्वनी प्रदूषणाशी संबंधित योग्य त्या विभागाकडून योग्य ती परवानगी किंवा परवाना घेतला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही प्रकारच्या ध्वनीवर्धक साहित्याचा वापर करून अजान देता येणार नाही. जर असे काही आढळले, तर हा ध्वनी प्रदूषणाशी संबंधित आदेशांचे उल्लंघन मानून, असे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था कायदेशीर कारवाईला पात्र असतील”

कोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर युक्तिवाद करताना असे म्हणण्यात आले होते, की अजान हे इस्लामचे अविभाज्य अंग असून, अजान देताना ध्वनीवर्धकांचा वापर करणे, घटनेच्या 25 व्या कलमानुसार धार्मिक स्वातंत्र्य आहे, आणि यामुळे कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही. परंतु, न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला. उलट या प्रकाराला कायद्याच्या कक्षेतील कारवाईचा विषय मानला.

रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेदरम्यान लाऊडस्पीकरवरून काहीही करण्यास परवानगी देता येणार नाही. कारण झोप किंवा विश्रांती हा मूलभूत अधिकाराबरोबरच मानवी अधिकार देखील आहे, असेही अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
एखाद्या व्यक्तीला नको असेल, ते एेकायला लावणे हा संबंधित व्यक्तीच्या स्वातंत्र्यांचा संकोच करण्याचा प्रकार असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात