वृत्तसंस्था
हैदराबाद : कोरोना विरोधातील युद्धात सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या भारत वैद्यकीय संशोधन क्षेत्रात देखील किती आघाडीवर आला आहे, याचा प्रत्यय युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांच्या भारतातील राजदूत आणि उच्चायुक्तांनी आज घेतला. Hyderabad the vaccine hub of Flag of India produces
हैदराबादेत भारत बायोटेकला युरोप, आफ्रिका खंडातील देशांच्या राजदूत, उच्चायुक्तांनी भेट देऊन तेथे कोरोना लसीच्या संशोधनाची माहिती घेतली आणि प्रकल्पाची पाहणी केली. तेथील प्रगतीविषयी या सर्व प्रतिनिधींनी समाधान तर व्यक्त केलेच पण कोरोना लसीच्या जागतिक उत्पादन क्षमतेविषयी एक वेगळा आत्मविश्वास देखील व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाने या राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा दौरा आयोजित केला होता. Hyderabad the vaccine hub of Flag of India produces
Hyderabad – the vaccine hub of ?? – produces a third of all vaccines manufactured globally. Witnessed first-hand the impressive research & manufacturing facilities at @BharatBiotech & @biological_e & the progress India is making in its COVID vaccine efforts. Thanks to @MEAIndia pic.twitter.com/uRcvrRDJUb— Barry O’Farrell AO (@AusHCIndia) December 9, 2020
Hyderabad – the vaccine hub of ?? – produces a third of all vaccines manufactured globally. Witnessed first-hand the impressive research & manufacturing facilities at @BharatBiotech & @biological_e & the progress India is making in its COVID vaccine efforts. Thanks to @MEAIndia pic.twitter.com/uRcvrRDJUb
Hyderabad the vaccine hub of Flag of India produces
औषध निर्मितीत भारताने कोरोना काळात जागतिक पातळीवर स्थान मिळवले आहे. कोरोना लस संशोधनातही भारतीय प्रयोगशाळांनी तशीच आघाडी घेतली आहे. यावर डेन्मार्कचे राजदूत एफ. सॅवन यांनी ट्विट करून भारतीय प्रयोगशाळांची प्रशंसा केली. भारतात केवळ व्यावसायिक दृष्टीने नव्हे, तर राष्ट्र प्रथम आणि मानवतेसाठी मोठे काम सुरू आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना विरोधातील लढाईत भारत संपूर्ण जगाची मदत करणार; पंतप्रधान मोदींची ग्वाही
भारतात औषध निर्मिती प्रयोगशाळांचा दर्जा जागतिक पातळीवरचा आहेच. त्याची उत्पादनक्षमताही जगाला पुरवठा करू शकेल एवढी मोठी आहे. भारताची ही कामगिरी जागतिक दर्जाची आणि वाखाणण्याजोगी आहे, असे ट्विट ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ,फेरॉल यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App