विशेष प्रतिनिधी
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर मराठा समाजाचे नेतृत्व करणारे दोन्ही खासदार भाजपचे आहेत. शरद पवारांनी मराठ्यांना कसे आरक्षण दिले नाही, असे एक खासदार बोलतात त्यांचा काय अभ्यास आहे? हे दोन्ही खासदार शरद पवारांविषयी गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप राज्याचे मंत्री, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी राजे यांच्यावर भुजबळांनी तोफ डागली. chhagan bhujbal lashesh out
भुजबळ म्हणाले, की ठाकरे – पवार सरकार नोकर भरती करायला जाते तेव्हा मराठा समाज विरोध करतो. त्यांचे बॅक स्टेज राजकारण सुरू आहे. पवारांनी आरक्षण टिकवू दिले नाही, असे भाजपचे खासदार म्हणतात. त्यांचा काय अभ्यास आहे?
भाजपचे दोन्ही खासदार नेतृत्व मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. कोण राजकारण करत आहे समजून घ्यावे. आम्ही कोर्टात चांगले वकील उभे केले आहेत. मराठाला आरक्षण मिळावे ही अपेक्षा आहे. पण ओबीसीचे मोर्चे सुरूच राहतील.
ओबीसी आरक्षण काढून टाकावे, यासाठी प्रयत्न सुरू असून ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आम्ही मोर्चे आंदोलन काढणाराच, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागायला नको ही मागणी आजही कायम आहे. काही लोक ओबीसी आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब सराटे सर्व भानगडी करत आहेत. मागे सर्वेक्षण झाले तेव्हा त्यांचीच कंपनी होती, आता याचिका तेच दाखल करत आहेत. अशी टीकाही भुजबळ यांनी केली आहे.
ओबीसी समाजाचे मोर्चे हे मराठा मोर्चांना उत्तर नाही
मराठा आरक्षणासंदर्भात २५ तारखेला सुनावणी होईल. त्यावेळी बाळासाहेब सराटे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ओबीसी समाजाचे मोर्चे हे मराठा मोर्चांना उत्तर नाही, असा दावा भुजबळ यांनी केला. न्याय्य मागण्यांसाठी ओबीसी मोर्चे आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून कुठलीही भरती आली तर तो थांबते. ओबीसीमध्ये बराचसा ओबीसी समाज कुणबी म्हणून आलाय. त्यातून नोकरी मिळेल.
मराठाला आरक्षण मिळावे हिच अपेक्षा
राज्य लोकसेवा आयोगापासून सर्व भरती थांबली आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये, यासाठी सरकार सबुरीने घेत आहे. आरक्षण देण्याची घोषणा २०१३-१४ मध्ये आघाडी सरकारने केली होती. शरद पवार यांच्याविषयी गैरसमज पसरविले जात आहे. ओबीसीला आरक्षण खूप पूर्वी मिळाले आहे. आयोगाने आरक्षण दिले. मुख्यमंत्री केवळ अंमलबजावणी करत असतात. आमच्यावर मराठा विरोधी म्हणून आरोप होत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App