हरियाणा करणार अडीच कोटी लोकांचे स्क्रिनींग, महाराष्ट्र कधी पाऊल उचलणार?


चीनी व्हायरसविरोधातील लढाईत उत्तर प्रदेश सरकारप्रमाणेच आता हरियाणाचेही मॉडेल बनू लागले आहे. तब्बल अडीच कोटी नागरिकांच्या स्क्रिनींगची तयारी हरियाणाने केली आहे. इकडे देशात सर्वाधिक कोरोनबाधीत आणि कोरोना बळींची संख्या असणारा महाराष्ट्र मात्र लॉकडाऊन कडक करण्याशिवाय फार काही करताना दिसत नाही.


विशेष प्रतिनिधी

पुणे : चीनी व्हायरसविरोधातील लढाईत उत्तर प्रदेश सरकारप्रमाणेच आता हरियाणाचेही मॉडेल बनू लागले आहे. तब्बल अडीच कोटी नागरिकांच्या स्क्रिनींगची तयारी हरियाणाने केली आहे. चीनी व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेला महाराष्ट्र लॉकडाऊन कडक करण्याशिवाय यासारखे उपाय कधी करणार, हा प्रश्न विचारला जात आहे.

हरियाणा सरकारने भिलवाडा मॉडेलप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या स्क्रीनिंगसाठी राज्यात १९ हजार ६६३ पथके बनवली आहेत. यात ३० हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी आहेत.

सामान्य स्थितीच्या जिल्ह्यांत आशा, एएनएम आणि अंगणवाडी सेविकांची पथके स्क्रीनिंग करतील. कंटेनमेंट झोनमधील जिल्ह्यांत या पथकांसह पोलिस, डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकांच्या स्क्रीनिंगचा डेटा नोंदीसाठी एक अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. आशा सेविका टॅबवर प्रत्येक व्यक्तीची माहिती नोंद करेल. एखाद्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यास ती माहिती तत्काळ आरोग्य विभागाला दिली जाईल.

त्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करून कोरोना चाचणीसाठी नमुने घेतले जातील. स्क्रीनिंगवेळी कुटुंबातील प्रत्येकाची पूर्ण माहिती घेतली जाईल. त्यांचा प्रवास इतिहासासह ते केव्हा बाहेर गेले, कोठे गेले होते हेही विचारले जाईल. रुग्णालयात गेले होते का, आजार आहे का, खोकला-सर्दी असेल तर केव्हापासून आहे, गेल्या काही दिवसांत संपर्कात कोण आले आदी माहिती घेतली जाईल.
हरियाणा राज्यात चीनी व्हायरसचे केवळ २२७ रुग्ण आहेत.

तरीही येथे चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. महाराष्ट्रातील चीनी व्हायरसच्या रुग्णांनी ३ हजारांचा टप्पा गाठला आहे. मात्र, महाराष्ट्रातील प्रशासन अद्यापही शहरांच्या सीमा सील करणे, लॉकडाऊन अधिक कडक करणे यामध्येच अडकले आहे. स्क्रिनींग करण्यासाठी म्हणावी अशी तयारी करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातील मुंबई,पुणे, नागपूर, मालेगावसारखी ठिकाणे सध्या चीनी व्हायरसचे हॉटस्पॉट बनली आहेत. तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात