महाराष्ट्राचे दिवाभीत मंत्रिमंडळ मीडिया, सोशल मीडियातून गायब; मोदींच्या आवाहनाला न भूतो न भविष्यती प्रतिसाद

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अख्ख्या देशाने एकजुटीने चीनी व्हायरस कोरोना विरोधात दिवे लावले. देश उजळला त्याच वेळी मुख्यमंत्र्यांसकट महाराष्ट्राचे अख्खे मंत्रिमंडळ दिवाभीतासारखे घरात बसून राहिले आणि मीडियातून, सोशल मीडियातून “गायब” झाले. इकडे रात्री बरोबर ९.०० वाजता देशातील वीजेचे दिवे बंद झाले. तेला, तुपाचे दिवे, मोबाईल, टॉर्चच्या बँटऱ्या चमकल्या. मीडियातून, सोशल मीडियातून या एकजुटीचा आणि कोरोना विरोधातील संयमी लढाईचा गजर सुरू झाला. १३० कोटी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद दिला आणि तिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे उथळ उर्जामंत्री नितीन राऊत ना मीडियात दिसले, ना सोशल मीडियात…!!

नितिन राऊत: तोंडावर आपटले

महाराष्ट्राचे अख्खे मंत्रिमंडळ जणू दिवाभीत झाल्यासारखे घरात बसले होते. राष्ट्रपतीभवनापासून सामान्यांच्या झोपडीपर्यंत दिवे उजळले. सेलिब्रिटींनी मीडियातून, सोशल मीडियातून दीप गीते सादर केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक चँनेलवर त्यांची दोन तास धूम चालली. फेसबुक, ट्विटर, इन्स्टावर कोट्यवधी लोकांची स्टेटस झळकली आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्री घरातच थंड बसले होते. वीजेचे दिवे बंद केले तर नँशनल पॉवर ग्रीड बंद पडेल, अशी अक्कल पाजळणारे उर्जामंत्री नितीन राऊतांनी नेमके कुठे तोंड लपवले, ते समजलेच नाही. जे नितीन राऊतांचे, तेच नबाब मलिकांचे आणि जितेंद्र आव्हाडांचे झाले. पंतप्रधानांना शिकवायला निघालेले राष्ट्रवादीचे मंत्री देखील तोंड दडवून बसल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे पक्षांध्यक्षांचे नातू रोहित पवार दिवे लावून मोकळे झाले. नँशनल पॉवर ग्रीडचे तांत्रिकदृष्ट्या प्रचंड यश…!! रात्री ९.०० वाजता वीज दिवे बंद झाल्यानंतर १२ हजार मेगॉवॉट मागणी घटेल, असा अंदाज नँशनल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांनी बांधून त्यानुसार नियोजन केले होते. 

केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग स्वत: जातीने घडामोड़ीवर लक्ष ठेउन होते.

पण प्रत्यक्षात या ९ मिनिटांमध्ये ३२ हजार मेगॉवॉट वीजेची मागणी घटली. परंतु, मागणी १० मिनिटांमध्येच पुन्हा वाढल्यावरही कोठेही अडचण न येता नँशनल पॉवर ग्रीडने वीज पुरवठा सुरळित ठेवला. फ्रिक्वेन्सी बँड ४९.७ ते ५०.२६ Hz दरम्यान राखण्यात यश आले. केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात