बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील मशिदीतून पोलिसांवर हल्ला; गोळीबार आणि दगडफेक

विशेष  प्रतिनिधी

पाटणा : बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील झंझनपूर तालुक्यातील गिदरगंज गावातील मशिदीत नमाजाच्या नावाखाली जमलेल्या मुस्लिम समूदायाने पोलिसांवर गोळीबार केला आणि दगडफेक केली. कोरोना लॉकडाऊन तोडून सुमारे १०० मुस्लीम गिदरगंजच्या मशिदीत एकत्र आलेत, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी मुस्लिम समूदायाला सोशल डिस्टंसिंग पाळण्याची विनंती केली परंतू, त्याला प्रतिसाद देण्याएेवजी मस्तीखोरांनी पोलिसांवरच मशिदीतून दगडफेक सुरू केली. यामध्ये काही पोलिस जखमी झाले. पोलिस कारवाई करतच मागे सरकत असताना मशिदीतून गोळीबार करत जमाव बाहेर आला. सुमारे एक किलोमीटरपर्यंत जमावाने पोलिसांचा पाठलाग केला. जमावाच्या गोळीबारातून एसडीओ थोडक्यात बचावले. पोलिसांनी मशिदीच्या इमामाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तबलिग जमातच्या मरकजमधून येथे येऊन काही परकीय मौलाना लपले असल्याचाही पोलिसांना संशय आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात