विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘पीएम सिटीझन्स असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड’ उर्फ ‘पीएमकेअर’ फंडबद्दल निर्माण केलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनता, सामाजिक संस्था, काॅर्पोरेट्स, सेलिब्रेटीजनी हात भरभरून पुढे केल्याने पीएमकेअर निधीमध्ये दहाच दिवसांत तब्बल साडेसहा हजार कोटी रूपये जमा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. वस्तूरूपी मदत गृहित धरल्यास तर ही रक्कम दहा हजार कोटी रूपयांच्या पुढे गेली आहे!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ मार्च रोजी पीएमकेअरची स्थापना केल्याची घोषणा केली होती. दुसरयाच दिवशी म्हणजे २९ मार्चरोजी कंपनी कामकाज मंत्रालयाने पीएमकेअरला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून देणग्या देता येतील, अशी दुरूस्ती नियमांत केली होती. त्यावरून विरोधी पक्षांनी आक्षेप घेतले होते. पंतप्रधान नैसर्गिक आपत्ती निधी (पीएमएनआरएफ) असताना हा नवा निधी का स्थापन केला?, असा सवाल विरोधकांनी विचारला होता.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तर पीएमकेअरचा निधी ‘पीएमएनआरएफ’मध्ये वळता करण्याची मागणी केली होती. काहींनी तर पीएमकेअर आणि त्या त्या राज्यांतील मुख्यमंत्री मदत निधी यांच्यामध्ये जाणीवपूर्वक स्पर्धा घडविण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील एक वकील थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने सर्व आक्षेप फेटाळले आणि पीएमकेअरवरील आरोपांमधील हवाच काढून टाकली. एकीकडे हे सगळे वादविवाद चालू असताना सामान्य जनता, काॅर्पोरेटस आणि सेलिब्रेटीज मात्र ठामपणे पीएमकेअरच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र आहे. नुसते उभे राहिले, नाही तर त्यांनी भरभरून मदत दिल्याने दहाच दिवसांत साडेसहा हजार कोटी रूपये पीएमकेअरमध्ये जमा झाले आहेत. याशिवाय, अनेक उद्योगांनी पीएमकेअरच्या माध्यमांतून व्हेंटिलेटर्स, व्यक्तिगत संरक्षण उपकरणे (पीपीई) आदी वस्तूरूपी मदत केलेली आहे. ती जर गृहित धरली तर एकूण देणगी रक्कम दहा हजार कोटी रूपयांच्या पुढे जाईल.
देशभर से लोगों ने COVID-19 के खिलाफ लड़ाई में सहयोग करने की इच्छा जाहिर की है।इस भावना का सम्मान करते हुए Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund का गठन किया गया है। स्वस्थ भारत के निर्माण में यह बेहद कारगर साबित होगा।— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
देशभर से लोगों ने COVID-19 के खिलाफ लड़ाई में सहयोग करने की इच्छा जाहिर की है।इस भावना का सम्मान करते हुए Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund का गठन किया गया है। स्वस्थ भारत के निर्माण में यह बेहद कारगर साबित होगा।
असा आहे पीएमकेअर निधी…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App