‘टाईम्स नाऊ’च्या पत्रकाराला लावला तोच न्याय उध्दवजींना का नाही?; किरीट सोमय्यांचा सवाल

लॉकडाऊनमध्येही खंडाळ्याहून महाबळेश्वरला आरामात गेलेले वाधवान कुटुंबिय, मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला झालेली अटक, टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीविरोधात दाखल झालेला गुन्हा या सारख्या घटनांमधून महाराष्ट्राचे गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसच चालवते की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचाही त्यावर वचक आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी चीनी व्हायरसच्य संशयित रुग्णाचे नाव घेतल्याने टाईम्स नाऊ या वाहिनीच्या पत्रकारावर गुन्हा दाखल होतो, तर तोच प्रकार केलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही गुन्हा कधी दाखल होणार का, असा थेट सवाल केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चीनी व्हायरसच्या संशयित रुग्णाचे नाव घेतल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टाईम्स नाऊ या वाहिनीच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात व्हायरसच्या प्रादुर्भावातून बरे झालेल्या बाळाचे नाव घेतले. मग पत्रकारालाा जो न्याय लावला तोच लावून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल कधी करणार असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या काहींना आसपासच्या नागरिकांकडून त्रास झाल्याची प्रकरणे घडली आहेत. त्यांना वाळीत टाकले जाण्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे रुग्णांचे नाव जाहीर करू नये किंवा त्यांची ओळख पटेल अशी माहिती देऊ नये, असा नियम सरकारने केला आहे.

एका राजकीय नेत्यासंदर्भात दावा करणाऱ्या टाईम्स नाऊ चॅनलवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. हाच न्याय लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्रही लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सहा महिन्याच्या एका बाळाचे चीनी व्हायरस पॉझिटिव्ह म्हणून नाव घेतलं होतं. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमादरम्यान पत्रकाराचे नाव पॉझिटिव्ह म्हणून घेतलं होतं. याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मिलिंद पाटील यांनी एका नेत्याचे नाव पॉझिटिव्ह म्हणून घेतलं होतं. त्यांच्याविरोधात गुन्हा केव्हा दाखल करणार? असा सवाल त्यांनी केला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात