विशेष प्रतिनिधी
मुंबई : डॉक्टर, नर्सवर थुंकणाऱ्यांना फोडून काढा. मुसलमानांमधल्या ज्या औलादी आहेत, त्यांना आताच ठेचून काढले पाहिजे. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे. नंतर आम्ही आहोतच पाहायला. पोलिसांवर हात टाकायची हिंमत होतेच कशी? मरकजच्या कोरोना पसरवणाऱ्यांना, विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घाला, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून आशेचा किरण दिसायला हवा होता, अशी टीका त्यांनी केली. कोरोना पसरवणाऱ्या विकृतांवर नुसत्या केसेस घालून काही होणार नाही. त्यांना फोडून काढणारे विडिओ व्हायरल झाले पाहिजेत. कायदे न पाळणाऱ्यांना काय शिक्षा होते हे लोकांना कळू द्या. काळाबाजार करणाऱ्यांनाही फोडून काढा. लॉकडाऊनची शिस्त पाळली नाही तर देशावर आणखी गंभीर परिणाम होतील. लॉकडाऊन कालावधी वाढविणे भाग पडेल. देशातील उद्योगधंद्यांवर, नोकऱ्यांवर परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुल्ला, मौलवींचा पाठिंबा या विकृतांना पाठिंबा आहे काय? ते कुठे गेलेत? मुस्लीम समाजाने स्वत:च्या वर्तणुकीतून संशयाचे वातावरण निर्माण केले आहे. कारलं तुपात तळा किंवा साखरेत घोळा कडू ते कडूच अशी अवस्था त्या समाजाची अवस्था आहे. उद्या एखाद्या पक्षाने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली तरी त्या पक्षांना दोष देऊ नका, असेही राज यांनी सुनावले.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे :
? लोकांमधील संभ्रम सरकारने दूर करावा.
? वसईत मरकज कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्याबद्दल पोलिसांचं अभिमंदन.
? कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करण्याऱ्यांना गोळ्या घाला.
? पंतप्रधान म्हणाले दिवे पेटवा, लोक करतीलही, घरी बसून काहीतरी करायचं म्हणून करतील, पण केवळ दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता.
? माझी सर्वांना विनंती आहे, लॉकडाऊन गांभीर्याने, रेशन, भाजीचे प्रश्न आहेत, ते अनेक ठिकाणी उपलब्ध आहे, सरकार उपलब्ध करतंय, हे गांभीर्याने घेतलं नाही आणि दिवस वाढवले तर त्याचे परिणाम उद्योगधंद्यासह सर्वांवर होईल.
? लोकांना भीती आहे नोकरी राहील का, भाजीपाला मिळेल का, रेशन मिळेल का वगैरे, पण काहीजण शिस्त पाळत नाहीत, त्यामुळे ही वेळ आलीय.
? मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला?
? भाज्यांवर थुंकणारे, नर्ससमोर नग्न होणारे यासारख्यांना फोडून काढलं पाहिजे, त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहिजेत.
? कडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, आक्षेपार्ह वागणाऱ्यांना फोडून काढलं पाहिजे.
? जर लोक असेच वागणार असतील तर लॉकडाऊन वाढेलच, डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी यांना पेशंट शोधायलाच वेळ जाईल, घरी लोक लपून बसलेत, लक्षणे आढळलेल्यांनी स्वत: पुढे आले पाहिजे.
? या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजे, तुम्हाला कुटुंब आहेत की नाही? तुमच्याही अंगलट येईल.
? हात जोडून विनंती आहे, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल.
? पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करणं योग्य नाही, पोलिसांकडून चुका होऊ शकतात, मात्र ही वेळ नाही.
? हे जे मुल्ला-मौलवी कुठे आहेत ते बघायचं आहे, निवडणुकीवेळी कुणाला मतदान करायचं सांगता, मग अशावेळी तुम्हाला सांगता येत नाही का?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App