चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्थिर होईल अशी काही विघ्नसंतोषी मोदीविरोधकांची अपेक्षा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मोदीविरोधकांच्या स्वप्नावर पाणी ओतले आहे. २०२० मध्ये भारताचा विकासदर खाली आला तरी २०२१ मध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा आहे.
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्थिर होईल अशी काही विघ्नसंतोषी मोदीविरोधकांची अपेक्षा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या मोदीविरोधकांना नाराज केले आहे. २०२० मध्ये भारताचा विकासदर खाली आला तरी २०२१ मध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था उसळी घेईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी गेल्या वर्षी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे मोदीविरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. भारताचा २०२० चा विकास दर ४.८ टक्के राहणार असून त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थाच संकटात येणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
भारताच्या विकासदरात येणारी घट ही सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेचा परिणाम असल्याचे त्यांनी सुचविले होते. त्यामुळे मोदी विरोधकांनी सरकारच्या आर्थिक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, चीनी व्हायरसच्या संकटामुळे सर्व चित्र बदलून गेले.
आता नव्याने जारी केलेल्या अंदाजात गीता गोपीनाथन यांनी म्हटले आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर उणे ३ टक्यांपर्यंत खाली येईल. मात्र, भारताचा विकास दर १.९ टक्के इतका असेल. २०२० मध्ये देशाची अर्थव्यवस्था तळ गाठेल. मात्र, पुढच्या वर्षी मात्र अर्थव्यवस्था उसळी घेईल.
चीनी व्हायरसमुळे जगाची अर्थव्यवस्थाच ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकालाही कोरोनाचा फटका बसला आहे. युरोपमधील जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या आघाडीच्या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही झटका बसला आहे. विकसित देशांची ही परिस्थिती असताना भारतासारख्या विकसनशिल देशांची अवस्था अधिकच बिकट बनली आहे. मात्र, जगाच्या तुलनेत भारत बरी कामगिरी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था पणाला लावून ‘जान है तो जहान है’ म्हणत २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. आता त्यांनी ‘जान भी और जहान भी’ म्हणत पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे धाडस केले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. मात्र, बाकी देशांच्या तुलेन चीनी व्हायरसमुळे मृत्यूचे प्रमाण भारतात लक्षणीयरित्या कमी राहणार आहे.
या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी भारताला त्याचा फायदा होणार आहे. २०१९ मध्ये भारताचा विकास दर हा ४.२ टक्के इतका होता. या वर्षी या घसरण होऊ हा विकास दर १.९ टक्के इतका असेल. पण २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थाही उसळी घेईल. २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के इतक्या वेगवान विकास दराने धावेल, असे गीता गोपीनाथ यांनी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App