मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना दिले ५ संकल्प भाजपचा ४० वा वर्धापन दिन

विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरस कोरोना विरोधातील दीर्घ लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ कलमी कार्यक्रम दिला. पीएम केयर फंडात योगदान वाढविण्याचा आग्रह केला. ते म्हणाले, “सारे जग अवघड काळातून चालले आहे. भारताने वेळेत आणि समग्रतेने जे काम केले त्याची WHO ने प्रशंसा केली. सार्क, जी २० संमेलन आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय जनतेने २२ मार्चचा बंद, २१ दिवसांचे लॉकडाऊन, कालचे रात्री ९.०० वाजताचे दीप प्रज्ज्वलन यात खूप प्रगल्भता दाखविली. कालच्या संकल्प प्रकाशाने दीर्घकालीन लढाई जिंकण्याचा आत्मविश्वास भारतीयांना दिला आहे. भारताने एकजुटीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मंचावर योगदान केले. जनसंघाच्या स्थापनेपासून संघर्ष, सेवेचा वारसा भाजपच्या कोटी कोटी कार्यकर्त्यांना मिळाला आहे. हाच वारसा पुढे नेत कोरोना विरोधातील लढाईत भाजपच्या कार्यकर्त्यांना मी काही सूचना करतो. कोणाच्याही मदतीला जाताना मास्क वापरा.”

मोदींचे पाच आग्रह :

  1.  गरीबांच्या रेशनसाठी अविरत सेवा अभियानात रेशन पोचवा. कोणीही उपाशी राहू नये याची काळजी घ्या.
  2.  मास्क वापरूनच लोकांची मदत करा.
  3.  धन्यवाद अभियानात धन्यवाद पत्र तयार करून ५ वर्गातील लोकांना पत्र द्या.सफाई कर्मचारी नर्स, डॉक्टर पोलिस, सरकारी कर्मचारी यांना द्या.
  4.  आरोग्य सेतू अँप कमीत कमी ४० लोकांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून द्या. संकटाच्या वेळेत हे काम करा.
  5.  कोरोनाची लढाई ही युद्धच आहे. प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांनी पीएम केयर फंडात योगदान करा. इतरांचे योगदान वाढवा. सोशल डिस्टंसिंग आणि शिस्त पाळण्याचा आग्रह करा.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात