कमलनाथांनी आयफा अँवॉर्डसाठी ठेवलेले ७०० कोटी रुपये शिवराज सिंहांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वळविले


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशात आयफा अँवॉर्ड कार्यक्रमासाठी कमलनाथ यांनी राखून ठेवलेले ७०० कोटी रुपये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वळवून मुख्यमंत्री निधीत जमा केले.
मध्य प्रदेशात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून काँग्रेस आणि कमलनाथ सत्तेवर आले होते. राहुल गांधींनी भाषणे करकरून कर्जमाफीच्या घोषणा केल्या होत्या. मात्र सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे तर दूरच कमलनाथ यांनी मध्य प्रदेशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर “उंचावण्याच्या” नावाखाली भोपाळ आणि इंदूरमध्ये चित्रपटांच्या आयफा अँवॉर्ड २०२० महासोहळा घेण्याचा घाट घातला होता. त्यासाठी त्यांनी एक दोन नाही तर तब्बल ७०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून राखून ठेवले होते. राज्य कंगाल स्थितीत पोचवून हा महागडा सोहळा मार्चमध्ये रंगणार होता. पण आधी कमलनाथांचे सरकार कोसळले आणि आता कोरोनाचे महासंकट आले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोहळा बासनात गुंडाळून ते ७०० कोटी रुपये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीकडे वळवून टाकले.
कमलनाथ हा निधी राखून ठेवत असतानाही चौहान यांनी त्याला विरोध केला होता. महागडे सोहळे आयोजित करण्यापेक्षा त्या निधीतून पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी चौहान यांनी त्यावेळी केली होती. पण आताच्या परिस्थितीत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात