प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांकडून पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांचे कौतुक, केंद्र सरकारला दिले 10 पैकी 9 गुण

Rakesh Jhunjhunwala hails PM Modi fiscal policies, gives 9 out of 10 to his economic management

Rakesh Jhunjhunwala : देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील आर्थिक स्थितीवर दिलखुलास भाष्य केले आहे. त्यांनी माध्यमांच्या महामारीतील वृत्तांकनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारच्या धोरणांचे कौतुकही केले आहे. Rakesh Jhunjhunwala hails PM Modi fiscal policies, gives 9 out of 10 to his economic management


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील आर्थिक स्थितीवर दिलखुलास भाष्य केले आहे. त्यांनी माध्यमांच्या महामारीतील वृत्तांकनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारच्या धोरणांचे कौतुकही केले आहे. झुनझुनवाला यांच्या मते, जुलैनंतर ही परिस्थिती सामान्य होईल, देशात कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. ते म्हणाले की, शेअर बाजार नेहमीच भविष्य पाहतो आणि कोरोना संकट तात्पुरते आहे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य उत्तम दिसत आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी ‘आज तक’चा विशेष कार्यक्रम ‘सीधी बात’मध्ये म्हटले की, कोरोना हा फ्लू आहे, कर्करोग नाही. देशातील 130 कोटी लोकांपैकी केवळ २ कोटींना कोरोना झाला आहे. अमेरिकेत 30 कोटी लोकसंख्येपैकी 3 कोटींना कोरोनाची लागण झाल आहे. त्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की भारतात किती टक्के लोकांना संसर्ग झाला आहे. ते म्हणाले की, गेल्या एक वर्षात देशातील वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली असून लवकरच परिस्थिती सामान्य होईल. इकॉनॉमी मॅनेजमेंट आघाडीवर राकेश झुंझुनवाला यांनी सरकारला 10 पैकी 9 गुण दिले. यामागे त्यांनी अनेक सकारात्मक कारणे सांगितली आहेत.

राकेश झुंझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘डिजिटल सोशलिस्ट’ ही उपाधी दिली. ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेचे डिजिटलायझेशन झाले आहे, ज्याचा आणखी फायदा होणार आहे. आज सरकारने पाठवलेल्या 100 रुपयांपैकी 85 रुपये लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तर राजीव गांधी म्हणाले होते की, 100 रुपयांपैकी केवळ 15 रुपये लोकांपर्यंत पोहोचत आहेत. हा बदल झाला आहे.

झुनझुनवाला म्हणाले की, अर्थव्यवस्थेबाबत त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन नाही, कारण सरकारचा महसूल वाढला आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संग्रह 1.41 लाख कोटी रुपये होता. आणि शेअर बाजार नेहमीच भविष्य पाहतो. इतकेच नाही तर देशातील सर्व बड्या कंपन्यांचे उत्पन्न गेल्या 3-4 तिमाहीत वाढले आहे. बिगबुल झुनझुनवाला म्हणतात की, भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने आहे. देश नव्या टप्प्यात प्रवेश करत असून यावर्षी विकास दर 10 टक्के होईल. आणि पुढील 20 वर्षांसाठी जीडीपी योग्य दिशेने जाईल. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात सरकारच्या वाढीसाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. ज्याचा योग्य निकाल काही वर्षांत दिसून येईल.

या संकटकाळात भारतीय बाजारात कोण गुंतवणूक करत आहे? ते म्हणाले की एलआयसी, फॉरेनर्स आणि सर्व किरकोळ क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आहे. मी स्वतः बाजाराची परिस्थिती बघून गुंतवणूक करतो. कोणतेही क्षेत्र बुडणार नाही, जुलैनंतर परिस्थिती सामान्य होईल.

या मुलाखतीच्या अखेरीस राकेश झुनझुनवाला यांनी माध्यमांचेही कान टोचले आहेत. ते म्हणाले की, या महामारीत माध्यमांनी चांगले काम करायला हवे, पण त्यांना सरकारवर टीकेची एक संधीच मिळालेली दिसते. त्यांनी माध्यमांना खासकरून इंडिया टुडेला आवाहन केले की, या महामारीत सगळं काही संपलं, अशी परिस्थिती रंगवण्यापेक्षा लोकांना या महामारीशी कसे लढायचे याविषयी बातम्या दाखवाव्यात.

Rakesh Jhunjhunwala hails PM Modi fiscal policies, gives 9 out of 10 to his economic management

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात