Mahindra And Mahindra : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात तब्बल 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच या क्षेत्रात जास्तीत जास्त वाटा उचलण्याचाही कंपनी विचार करत आहे. Mahindra And Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, target to sell 5 lakh electric vehicles by 2025
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात तब्बल 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच या क्षेत्रात जास्तीत जास्त वाटा उचलण्याचाही कंपनी विचार करत आहे.
‘टीव्ही 9’ने दिलेल्या वृत्तानुसार, महिंद्रा अँड महिंद्रा जागतिक स्तरावर क्षमतेच्या जोरावर इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासावर जोमाने काम करत आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिष शाहा म्हणाले की, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही पूर्वी जे बोललो होतो, त्याव्यतिरिक्त ही गुंतवणूक असेल.”
महिंद्रा आणि महिंद्राकडून आधी असे सांगण्यात आले होते की, येत्या पाच वर्षांत वाहन आणि कृषी क्षेत्रात 9,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यावर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने उतरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. याशिवाय नवीन संशोधन आणि विकास केंद्रात (आर अँड डी) 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
महिंद्रा आणि महिंद्राने यापूर्वीच बंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा प्रकल्प सुरू केला आहे. येथे बॅटरी पॅक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटारीचे उत्पादन होते. याशिवाय महाराष्ट्रात पुण्याजवळील चाकण प्लांटमध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठीही कंपनीने गुंतवणूक केली आहे.
Mahindra And Mahindra to invest Rs 3,000 crore in electric vehicle business, target to sell 5 lakh electric vehicles by 2025
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App