भारतीय अर्थव्यवस्था धावणार वेगाने, आयएमएफने व्यक्त केला १२.५ टक्के विकासदराचा अंदाज, चीनलाही टाकणार मागे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजावर मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात आता आयएमएफच्याच अहवालाने अंजन घातले आहे. भारताचा विकासदर १२.५ टक्के होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Indian economy to grow faster, IMF forecasts 12.5 per cent growth, overtakes China


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजावर मोदी सरकारवर टीका करणाऱ्याच्या डोळ्यात आता आयएमएफच्याच अहवालाने अंजन घातले आहे. भारताचा विकासदर १२.५ टक्के होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२१ मधील भारताच्या विकासाच्या अंदाज वर्तवला आहे. भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात वेगाने धावणार आहे. २०२१ मध्ये भारताचा आर्थिक विकासदर हा १२.५ टक्के इतका असेल, असा अंदाज नाणेनिधीने वर्तवला आहे. एवढेच नाही भारत यंदाच्या वर्षात चीनलाही मागे टाकेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भारताचा विकासदर कमी होणार असल्याचा दावा करणाऱ्या आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथन यांनीच हा अहवाल केला आहे.कोरोनाच्या संकटाला संधी मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अनेक निर्णय घेतले. मंदीतील अर्थव्यवस्थेला तेजीत आणण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारताचा नारा देत देशी उद्योगांना संजीवनी दिली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. आयएमएफच्या अहवालातही त्याचे प्रतिबिंब पडले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल २०२२ चाही अंदाज वर्तवला आहे.

२०२२ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा ६.९ टक्के म्हणजे जवळपास ७ टक्के असेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे. जागितक बँकेसोबत होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यासंदर्भातला अहवाल जाहीर केला आहे. २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत ८ टक्यांची घसरण झाली. पण आता या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा १२.५ टक्के असेल. हा विकास दर चीन पेक्षाही खूप चांगला आहे. यावर्षी २०२१ मध्ये चीनचा आर्थिक विकास दर हा ८.६ टक्के आणि २०२२ मध्ये ५.६ टक्के इतका असेल, असा नाणेनिधीचा अंदाज आहे. गेल्या वर्षी चीनचा आर्थिक विकास दर हा २.३ टक्के इतका होता. जो करोना संकटाच्या काळात सकारात्मक होता. करोना संकटातही सकारात्मक विकास दर राखणारा चीन हा जगातील एकमेव देश होता.

यंदा जागतिक अर्थव्यवस्थाही अधिक बळकट होणार आहे. २०२१ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर हा ६ टक्के आणि २०२२ मध्ये ४.४ टक्के इतका असण्याची शक्यता आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितलं.

Indian economy to grow faster, IMF forecasts 12.5 per cent growth, overtakes China


इतर बातम्या वाचा…

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*