Economic Survey 2021: आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण, अर्थसंकल्पाशी थेट संबंध कसा ते जाणून घ्या

Economic Survey 2021: Economic Survey to be presented today, find out how it relates directly to the budget

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणही तिसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 5 जुलै 2019 रोजी सर्वप्रथम अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थमंत्री आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमणही तिसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 5 जुलै 2019 रोजी सर्वप्रथम अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थमंत्री आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण काय आहे आणि ते बजेटशी कसे संबंधित आहे, याबद्दल महत्त्वाची माहिती येथे थोडक्यात देत आहोत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात

अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होईल. शुक्रवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. साधारणपणे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. परंतु, यावेळी अर्थसंकल्पाच्या दोन दिवस आधी 2020-21 या आर्थिक वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण आज संसदेत सादर करण्यात येणार आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे.प्रामाणिक दस्तऐवजाचा दर्जा

आर्थिक सर्वेक्षण हे अर्थ मंत्रालयाचे प्रामाणिक दस्तऐवज मानले जाते. आर्थिक सर्वेक्षणात आर्थिक विकासाचा वार्षिक ताळेबंद असते. आर्थिक सर्वेक्षण अर्थव्यवस्थेच्या सर्व बाबींचा तपशीलवार सांख्यिकी डेटा देते. गेल्या एक वर्षात अर्थव्यवस्था व सरकारी योजनांमध्ये काय प्रगती झाली आहे याबाबत आर्थिक सर्वेक्षणातून माहिती मिळते. आर्थिक सर्वेक्षण वित्त मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागाराने तयार केले आहे. सध्या मुख्य आर्थिक सल्लागार केव्ही सुब्रमण्यम आहेत.

2 भागांमध्ये असते आर्थिक सर्वेक्षण

सन 2015 नंतर आर्थिक सर्वेक्षण दोन भागांत विभागण्यात आले. पहिला भाग अर्थसंकल्पाविषयी सांगतो, जो अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी जाहीर होतो. दुसर्‍या भागात, महत्त्वाच्या आकडेवारीचा समावेश असतो. फेब्रुवारी 2017 नंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ बदलण्यात आली आहे. आर्थिक सर्वेक्षणात धोरणात्मक निर्णय, आर्थिक आकडेवारी, आर्थिक संशोधन आणि क्षेत्रनिहाय आर्थिक ट्रेंडचे विश्लेषण यांचा समावेश असतो. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, आर्थिक सर्वेक्षण हे अर्थसंकल्पातील मार्गदर्शक तत्त्वे दर्शवत असते.

Economic Survey 2021: Economic Survey to be presented today, find out how it relates directly to the budget

Economic Survey 2021: Economic Survey to be presented today, find out how it relates directly to the budget

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती