UPI Transactions : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर 50 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांवर कायमस्वरूपी बंदी घालू शकते. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन नियम या आठवड्याच्या शेवटी लागू होऊ शकतो. यूपीआयमधील व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कारण अलीकडेच व्यवहारांच्या संख्येत वाढ झाली आहे. Big news! UPI Transactions below Rs 50 could be banned soon by NPCI
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर 50 रुपयांपेक्षा कमी व्यवहारांवर कायमस्वरूपी बंदी घालू शकते. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन नियम या आठवड्याच्या शेवटी लागू होऊ शकतो. यूपीआयमधील व्यवहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कारण अलीकडेच व्यवहारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल व्यवहार, बँकिंगमधील अडथळे आणि तांत्रिक समस्या वाढणे हे त्याचे मुख्य कारण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनपीसीआयला मागच्या काही आठवड्यांपासून गेमिंग मर्चंट्सच्या कमी तिकिटाच्या व्यवहारांत मोठी वाढ आढळली आहे. आयपीएल सामन्यादरम्यान हे व्यवहार आणखी वाढले आहेत. यामुळे एनपीसीआय आणि सदस्य बँकांना काळजी वाटतेय की, व्यवहारांचे प्रमाण वाढल्यामुळे सिस्टम आउटेज होऊ शकते.
एनपीसीआयच्या मते, ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी यूपीआयऐवजी नेट बँकिंगसारख्या स्थायी (एसआय) पेमेंट पद्धतीचा वापर करावा. परंतु यामुळे मायक्रोट्रान्सपोर्टवर आधारित रिअल-मनी गेमिंगसाठी अडचणी येऊ शकतात. मंथली सबस्क्रिप्शन भरण्याऐवजी, गेम खेळणारे वेळोवेळी पेमेंट करतात. यामुळे बहुतांश व्यवहार 100 रुपयांपेक्षा कमी आहेत.
गेमिंग इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, भविष्यात यूपीआयचा वापर खूप कमी होऊ शकतो. गेमिंग इंडस्ट्रीच्या अहवालानुसार, एनपीसीआय अनेक आठवड्यांपासून अशा बंदीचा विचार करत आहे. मोठ्या मर्चंट्सच्या ते संपर्कात होते. एनपीसीआयने अशा कमी रकमेच्या व्यवहारावर बंदी आणल्यास बँकिंग उद्योगावर थेट परिणाम होऊ शकतो.
Big news! UPI Transactions below Rs 50 could be banned soon by NPCI
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App