Alert For Bank Customers : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी क्षेत्रातील एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी सूचना जारी केली आहे. यानुसार या दोन्ही बँकांच्या अनेक सेवा रात्री काही काळासाठी बंद राहतील. दोन्ही बँकांनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट जारी करत ही माहिती दिली आहे. यामुळे जर तुमचे नेटबँकिंग, यूपीआयशी संबंधित काही काम असेल तर ते दिवसाच उरकून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Alert For Bank Customers, SBI And HDFC Bank Services Will Not available During Night today
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी क्षेत्रातील एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी सूचना जारी केली आहे. यानुसार या दोन्ही बँकांच्या अनेक सेवा रात्री काही काळासाठी बंद राहतील. दोन्ही बँकांनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट जारी करत ही माहिती दिली आहे. यामुळे जर तुमचे नेटबँकिंग, यूपीआयशी संबंधित काही काम असेल तर ते दिवसाच उरकून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBIने म्हटलेय की, 7 मे रोजी रात्री 10:15 वाजेपासून ते 8 मे पहाटे 1:45 वाजेपर्यंत बँकेच्या मेंटेनन्सचे काम होईल. बँकेच म्हणणे आहे की, यादरम्यान एसबीआय ग्राहकांना INB/YONO/YONO Lite/UPI सर्व्हिसेसचा वापर करता येणार नाही.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better banking experience. #SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #InternetBanking #OnlineSBI pic.twitter.com/JogglXemol — State Bank of India (@TheOfficialSBI) May 6, 2021
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better banking experience. #SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #InternetBanking #OnlineSBI pic.twitter.com/JogglXemol
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 6, 2021
SBIने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेचे म्हणणे आहे की, कस्टमर एक्स्पीरिएंस चांगला करण्यासाठी हे काम केले जात आहे.
खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँकेनीही आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. बँकेने म्हटले की, त्यांच्या नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा शुक्रवारी रात्री बाधित राहतील.
बँकेतून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या एका Email संदेशात म्हटलेय की, काही निश्चित मेंटेनन्स एक्टिव्हटीमुळे 8 मे पहाटे 2 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा उपलब्ध नसतील. असुविधेसाठी खेद आहे.’
एचडीएफसी बँक भारतातील खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक आहे. आपल्या ग्राहकांना सातत्याने चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. इंटरनेट सेवांमध्ये अनेक अडथळे यापूर्वी आले होते, यामुळे बँक वेळोवेळी दुरुस्तीचे काम करते.
Alert For Bank Customers, SBI And HDFC Bank Servises Will Not availabel During Night today
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App