PM Modi : केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, काल मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची आहे, कारण एक दिवस अगोदर दोन घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. मंगळवारी सकाळी केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ संपला होता आणि भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही.