• Download App
    Mamata Banerjee ममता बॅनर्जींना बंडखोरांचा मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून डच्चू!!

    ममता बॅनर्जींना बंडखोरांचा मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून डच्चू!!

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी आधी दोन तृतीयांश पक्ष फोडला. विधानसभेतली विरोधी पक्षनेते पदाची कायदेशीर लढाई जिंकली आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला. ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून डच्चू दिला. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृखालील बंडखोर आमदाराच्या गटाने ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविले, तर अभिषेक बॅनर्जी यांना थेट पक्षातून निलंबित करून टाकले. बंडखोर आमदाराच्या गटाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. Mamata Banerjee

    आपणच खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा या बंडखोर आमदारांच्या गटाने केला. त्यानंतर या बंडखोर गटाने संघटनात्मक समितीची स्थापना देखील केली. संघटनात्मक समितीची स्थापना करताच बंडखोर आमदाराच्या गटाने मोठी घोषणा केली. त्यांनी ममता बॅनर्जी यांना पार्टीच्या अध्यक्षपदावरून हटवलं असून, अभिषेक बॅनर्जी यांना तर थेट पक्षातून निलंबित करण्यात आल्याचा ठराव मंजूर केला.



    – अरूप रॉय यांची नियुक्ती

    बंडखोर गटाचे ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची नव्याने स्थापन झालेल्या संघटनात्मक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये या बंडखोर आमदारांनी बैठक घेऊन हे दोन मोठे निर्णय घेतले. विशेष म्हणजे या बैठकीला कोलकाता महापालिकेसह तीन जिल्ह्यांमधील 70 नगरसेवक देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटविले असून, त्यांच्या जागी आता अध्यक्षपदी म्अरूप रॉय यांची नियुक्ती केली. अरूप रॉय हे हावडा सेंट्रल मतदारसंघाचे आमदार आहे.

    – आमदार – खासदार फुटले

    पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला. भाजपची सत्ता आली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या राजकीय दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. भाजपची सत्ता येताच ममतांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. आधी आमदार फुटले, त्यानंतर खासदार फुटले आता तर ममता बॅनर्जी यांना थेट अध्यक्षपदावरून हटविले. तसेच अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित केले, त्यांच्याऐवजी अध्यक्ष म्हणून अरूप रॉय यांची नियुक्ती केली. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

    Major setback for Mamata Banerjee from rebels.

    Related posts

    Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी होते, यातील बहुतांश पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते