• Download App
    Rohit Pawar कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल; 29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

    Rohit Pawar : कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल; 29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुबई : Rohit Pawar  राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे,” असा घणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.Rohit Pawar

    गिरीश महाजनांनी पंढरपूरमध्ये दिलेला शब्द पाळला नाही

    रोहित पवार यांनी नुकत्याच पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केलेल्या ‘अन्नत्याग आंदोलना’चा संदर्भ देत सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “पंढरपूरमध्ये २६ शेतकऱ्यांसह आम्ही अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः फोन करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती आणि २२ तारखेपूर्वी तातडीने बैठक घेऊन शेतकऱ्यांचे मुद्दे ऐकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने तो शब्द पाळला नाही. हा थेट शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे.”Rohit Pawar



    ४४ लाख शेतकऱ्यांवर अन्याय; ही योजना केवळ नावापुरती

    सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रोहित पवार म्हणाले, कर्जमाफी योजनेत इतक्या जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत की, तब्बल ४४ लाख शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. राज्यातील ५५ लाख शेतकऱ्यांपैकी फक्त काही मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ही योजना केवळ नावापुरती कर्जमाफी असून, प्रत्यक्षात अनेक अटी लावून शेतकऱ्यांना बाहेर ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. सरकार केवळ फसवे आकडे दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे.

    २९ जूनला संभाजीनगरात रणशिंग फुंकणार

    पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला धारेवर धरताना रोहित पवार यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. “येत्या २९ जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने एक विशाल आंदोलन करण्यात येईल.” “आम्ही सरकारला ३० तारखेपर्यंतचा वेळ देत आहोत. जर सरकारने कर्जमाफीतील जाचक अटी मागे घेतल्या नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर अधिक तीव्र केले जाईल. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, आम्ही या सरकारला सोडणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

    दरम्यान, नुकत्याच लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निकालांवरूनही रोहित पवारांनी महायुतीला आणि विशेषतः भाजपला लक्ष्य केले. “नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला आणि महायुतीचा (शिंदे गटाचा) अधिकृत उमेदवार पराभूत झाला, हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का आहे.” “या निकालावरून मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा किती अभाव आहे, हे स्पष्ट दिसते. भाजप कोणाचाही खरा मित्र नाही. ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करतात, सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे डाव खेळतात आणि सोबत असलेल्या मित्रपक्षांनाच राजकीयदृष्ट्या कमकुवत करून संपवतात.” रोहित पवार यांनी सरकारला कर्जमाफीतील अटींसोबतच इतर अनेक मुद्द्यांवरून घेरले. “राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही आणि अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत,” असे ते म्हणाले. “२९ जूनचे आंदोलन ही फक्त एक सुरुवात आहे. जोपर्यंत सरकार आपला निर्णय बदलत नाही, तोपर्यंत हा संघर्ष आणि आंदोलन थांबणार नाही,” अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी मांडली

    Rohit Pawar Warns of Mega Protest in Chhatrapati Sambhajinagar Over Loan Waiver Rules

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष

    Ramdas Kadam’ : सहा नव्हे सात खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र तयार; रामदास कदम यांच्या विधानाने खळबळ, आमदारही फुटीच्या मार्गावर असल्याचा केला दावा

    Vidhan Parishad Election Results: : विधान परिषदेत महायुतीचा महाविजय! महाविकास आघाडीचा धुव्वा; कुठे क्रॉस व्होटिंग तर कुठे बंडखोरीने फिरवली निवडणुकीची दिशा