विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या परिवारामध्ये ६ नवीन खासदार सामील झाले असून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सेनेतून फुटून आलेल्या खासदारांना दिला. त्याचवेळी या सगळ्या खासदारांना पुढल्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर निवडून आणायचा शब्द सुद्धा दिला. या खासदारांच्या विश्वासाला तडा कधीही जाऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. केंद्राशी निगडित प्रश्न असतील वा राज्यातील प्रश्न, कुठेही अडवणूक होणार नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये सर्व खासदारांबरोबर पत्रकार परिषद घेतली.
ही सगळी ताकद एकत्र आल्यानंतर आपली शिवसेना अधिक भक्कम होईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन टायगर आता फुलप्रूफ सक्सेस झालं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यासंंबंधित सर्व कायदेशीर गोष्टी आम्ही केल्या आहेत, अशी पुस्तीही श्री शिंदे यांनी जोडली. ठाकरेंची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
– एकनाथ शिंदे म्हणाले :
– उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. हे सहा जण खऱ्या शिवसेना परिवारात सामील झाले, याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो. चार वर्षांपूर्वी आपण शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला. आता हा लढा दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे.
– संजय पाटील हा जनतेशी जोडलेला, ग्राऊंड लेव्हलवर काम करणारा कार्यकर्ता आहे. संजय दिना पाटील हा करा दिनांचा कैवारी असून दोस्ती जपणारा आहे. ओमराजे हे त्यांच्या मनाचे राजे आहेत. पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते आपल्यासोबत आले. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी विकासासाठी, न्यायासाठी आपली साथ दिली. काही लोकांनी त्यांना हिणवलं, त्यांना रील स्टार म्हणाले. पण ओमराजे हे रिअल स्टार आहेत.
– संजय देखमुख हे उत्तम असून त्यांना अधिक उत्तम काम करायचं असल्याने ते आपल्याकडे आहे. नागेश पाटील आष्टीकर हे अत्यंत चांगले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे देखील असेच कार्यकर्ते आहे.
– हे सर्व खासदार मतदारसंघातील विकासासाठी आपल्याकडे आले आहेत. 2022 साली बाळासाहेबांची विचारधारा सोडून दुसरा विचार आला त्यावेळी आम्ही उठाव केला. त्यावेळी आपल्यासोबत आलेले 40 आमदार परत निवडून येणार नाहीत असं म्हटलं जायचं. परंतु 40 चे 60 आमदार निवडून आले. चांदा ते बांदापर्यंत शिवसेना मोठी झाली. आमची नीती स्पष्ट होती, विचारधारेला घेऊन आम्ही पुढे गेलो.
– आता आपल्या या कामात सहा खासदार सामील झाले आहेत. या सहा लोकांची ताकद, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे शिवसेना आणखी बळकट होतील. या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामं, त्याच्या अडचणी सोडवण्यात येतील. मी दिलेला शब्द पाळतो, त्यामुळे एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवतात.
Six of Thackeray’s MPs join Shinde’s Shiv Sena.
महत्वाच्या बातम्या
- NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!
- कोलकाता हत्याकांडाचा पुसला कलंक; सुऱ्हावर्दी अवेन्यू रोडचे नाव बदलून केले गोपाल मुखर्जी रोड!!
- NEET exam : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिल्ली विमानतळावरच वेटिंग!!
- MP Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरचे ‘किंगमेकर’ ठरणार ओमराजे, एका निर्णयावर ठरणार ठाकरे-शिंदेंची पुढील राजकीय लढाई