• Download App
    NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!

    NEET परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले??, कशी होती व्यवस्था??; NTA ने केला खुलासा!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पेपरफुटी नंतर गाजलेली NEET (UG) परीक्षा आज झाली. संपूर्ण देशभर अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा आज घेण्यात आली. विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर पोहोचताना गैरसोय होऊ नये म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आज कोलकात्याहून येताना नवी दिल्ली विमानतळावर काही वेळ थांबणे पसंत केले. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर ते विमानतळावरून आपल्या निवासस्थान ७, लोककल्याण मार्गाकडे रवाना झाले.

    पण या NEET (UG) परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले होते आणि परीक्षेची व्यवस्था कशी होती??, याचा खुलासा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केला.

    NTA ने जारी केलेल्या निवेदनानुसार, आज भारतातील ५,४४० आणि परदेशातील १४ केंद्रांवर NEET (UG) २०२६ ची पुनर्परीक्षा २० लाखांहून अधिक उमेदवारांनी दिली. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह एकूण १३ भाषांमध्ये घेण्यात आली. १०,००० हून अधिक दिव्यांग उमेदवारांसह सर्वच उमेदवारांसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली होती.

    वैद्यकीय समस्या असलेल्या सुमारे ८१ उमेदवारांसाठी विशेष सोय करण्यात आली होती; यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेला एक विद्यार्थी आणि केमोथेरपी घेत असलेला एक विद्यार्थी यांचा समावेश होता, ज्यांनी वर्षानुवर्षे तयारी केलेल्या परीक्षेला मुकणे टाळण्याचा दृढ निश्चय केला होता. परीक्षा केंद्रांवर आधार-आधारित बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळखण्याची प्रणाली), सीसीटीव्हीद्वारे देखरेख, जॅमर्स आणि राज्य पोलिसांच्या मदतीने दोन-स्तरीय तपासणी (frisking) यांसारख्या उपाययोजना लागू करण्यात आल्या होत्या.

    Exactly how many students appeared for the NEET exam?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : मोदी ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडला पोहोचले; दोन्ही देश FTA करार अंतिम करतील; पीएम ऑकलंडमध्ये 40 हजार भारतीयांना संबोधित करतील

    TVK Chief Vijay : विजय म्हणाले- करूर चेंगराचेंगरी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख; पोलिसांना गर्दी आवरण्यात अपयश आले, डीएमकेने 41 मृत्यूंसाठी मला जबाबदार धरले

    Ram Mandir : राम मंदिर चोरी- देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा राजीनामा; देणगीमध्ये ₹10-20 च्या नोटा वाढल्या, 500 च्या नोटा कमी झाल्या