विशेष प्रतिनिधी
नाशिक : भारतासह जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जीवनात योगाचं असलेलं महत्त्व पटवून सांगत असतात. यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकत्याच्या रेड रोडवर योग दिन साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोडवर नवा इतिहास घडला. ज्या रस्त्यावर फक्त नमाजासाठी परवानगी होती, बाकी कुठल्याही हिंदू सणांना परवानगी नव्हती, त्या रेड रोडवरच्या नमाजाची मक्तेदारी मोदींनी योग दिवस साजरा करून मोडली.
यावेळी मोदी म्हणाले, ‘पश्चिम बंगाल, कोलकातामध्ये स्वच्छतेसाठी जे योगदान दिलं जात आहे, त्यासाठी मी कोलकातावासीयांचे कौतुक करेन. स्वच्छतेतून स्वागत योग दिनाच्या निमित्ताने आज बंगालमध्ये असणं हे खूपच विशेष आहे.
बंगालच्या भूमीवर भगवान रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या सिद्ध संतांनी अवतार घेतला. येथूनच स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली. लाहिरी महाशय यांच्यासारख्या महान योग्यांनी जिथे योग परंपरेला नव्या उंचीवर नेलं, अशा या पवित्र भूमीवर आज सामूहिक योगाचा अनुभव एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देत आहे.इथे आजूबाजूला अनेक लोक एकत्र आले आहेत, हेच एकत्र येणे म्हणजे योगाचा खरा भाव आहे. योग हा मानवी जीवनासाठी चेतनेबरोबरच ऊर्जेचा आणि प्रकाशाचाही स्रोत आहे. वय वाढलं तरी आपण निरोगी राहू शकतो. संतुलित आहार-विहाराने, संतुलित क्रिया आणि कर्मांनी, संतुलित झोप आणि जागरणाने योग दुःखांचा नाश करणारा ठरतो. संतुलित योग हाच जीवनाचा आधार आहे.
मोदी म्हणाले, ‘परंतु आजच्या आधुनिक काळात बहुतेक लोक असंतुलनात जगत आहेत. योग केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच लक्ष केंद्रित करत नाही, तर योग मानसिक आरोग्यातून शारीरिक आरोग्याचा मार्ग दाखवतो. योग आपल्या जीवनात शांतीचा स्रोत बनतोच, त्याचबरोबर त्यातून विश्वशांतीचा मार्गही खुला होतो. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोक योगाशी जोडले जातात. यावर्षी ‘योग 365’ या उपक्रमालाही पुढे नेण्यात आले. 130 देशांतील 30 कोटींहून अधिक लोकांनी यात सहभाग घेतला आहे.!!
– 35 हजार लोकांचा रेड रोडवर नवा इतिहास
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील ऐतिहासिक रेड रोडवर आज नवा इतिहास घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येथे 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधानांसोबत 35 हजारांहून अधिक लोकांनी एकत्र योगाभ्यास केला. रेड रोडवर सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत योग करण्याची संधी मिळाल्याने कोलकातावासीय आनंदी दिसत होते. अनेक वर्षांनंतर रेड रोडवर इतक्या मोठ्या प्रमाणात योग दिवसाचा कार्यक्रम झाला.
स्थानिक लोकांनी सांगितले की, यापूर्वी कोलकात्यात कधीही एवढ्या भव्य प्रमाणात योगाचा कार्यक्रम झाला नव्हता. पंतप्रधानांसोबत योग करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ज्या रेड रोडवर आज 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा कार्यक्रम पार पडला, त्या रेड रोडचं स्वतःचं एक वेगळं महत्त्व आहे. आतापर्यंत या रेड रोडवर फक्त नमाजसाठी परवानगी दिली जात होती. पण कोणत्याही हिंदू सणासाठी किंवा योगासाठी येथे परवानगी दिली जात नव्हती. आज पंतप्रधानांसोबत योग करून खूप छान वाटल्याचं नागरिकांनी सांगितलं.
Modi broke the monopoly on Namaz on Kolkata’s Red Road by celebrating Yoga Day!!
महत्वाच्या बातम्या
- Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर,
- पवनराजे हत्याकांडाचा निकाल; काँग्रेस मधल्या जुन्या राजकारणाचे झेंगट आता शिवसेना – भाजपच्या गळ्यात!!
- Monsoon : मान्सून 23 जून रोजी तेलंगणातून पुढे सरकेल:महाराष्ट्रात मान्सून आणणारी प्रणाली सक्रिय
- Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरविरुद्ध दोषारोप झाले निश्चित:जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुनावणीस सुरुवात