• Download App
    ED Raids 15 लाख कोटींचा गैरव्यवहार:राजेश एक्सपोर्ट्सवर छापे, 9 ठिकाणी कारवाई, सेबीकडून निगराणी

    ED Raids : 15 लाख कोटींचा गैरव्यवहार:राजेश एक्सपोर्ट्सवर छापे, 9 ठिकाणी कारवाई, सेबीकडून निगराणी

    ED Raids

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ED Raids  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या ९ ठिकाणांवर छापे टाकले. सेबीकडून सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर कंपनीवरील पाळत वाढली आहेED Raids

    ईडीच्या माहितीनुसार ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) करण्यात आली आहे. यात बेंगळुरू आणि मुंबईतील कार्यालयांची झडती घेण्यात आली. कंपनीच्या शेअर्समध्ये बेनामीदारांच्या माध्यमातून अनेक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. सुमारे १६७ कोटी रुपये देशाबाहेर पाठवण्यात आले.ED Raids



     

    याशिवाय, कंपनीने यूएईच्या काही संशयास्पद संस्थांसोबत ३ हजार कोटी रुपयांच्या खातेवह्यांची आपापसात तडजोड (ॲडजस्टमेंट) केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. कंपनीच्या नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध सोने यामध्ये तब्बल ४० टक्क्यांची तफावत आढळून आली आहे. कंपनीने ५ वर्षांत त्यांच्या विदेशी उपकंपन्यांच्या माध्यमातून उलाढाल चुकीच्या पद्धती दाखवली होती.

    ED Raids Rajesh Exports Over SEBI’s ₹15 Lakh Crore Fraud Probe

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सार्वजनिक ठिकाणी पोर्न पाहण्यावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली; सुप्रीम कोर्ट म्हणाले- सरकारकडे जा, हा कायदा बनवणाऱ्यांचा प्रश्न आहे

    Ram Mandir Donation : राममंदिर देणगी चोरी- ट्रस्टने CEO भरती काढली; सर्वोच्च न्यायालयाने SIT कडून अहवाल मागवला

    Retail Inflation : महागाईचा दर सलग सहाव्या महिन्यात वाढला:जूनमध्ये 4.38% वर पोहोचली, खाण्यापिण्याच्या वस्तू महाग झाल्या