काही लोक कार्यकर्त्यांना कस्पटा सारखे वागवितात, घरगडी समजतात त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मातांसाठी आता किती लाचारी पत्करणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ता. ४ हिंगोली येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
मराठी आणि हिंदी भाषिक वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत संतुलित आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठी माणूस संकुचित नाही, तो संस्कारी आहे, अभिमानी आहे; मात्र हिंसक नाही, असे सांगत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या भाषिक वादावर भाष्य केले. जो कोणी मुंबईत येईल, त्याचे स्वागत आमचा महाराष्ट्र करेल. तसेच भाषेच्या किंवा धर्माच्या आधारे कुणालाही लक्ष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस सरकार मध्ये राहून पवार संस्कारितांच्या गेमा; भाजपच्या मंत्र्यांना बदनाम करा!!, असला प्रकार फडणवीस सरकार मधल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समोर आणला. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे विधवा महिलांना देण्यात अडथळा आणणाऱ्या ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा मेघना बोर्डीकर यांनी वापरली होती. पण त्या कार्यक्रमाचा अर्धवट व्हिडिओ अजित पवारांच्या नेत्याने आमदार रोहित पवारांना दिला, असा धक्कादायक खुलासा मेघना बोर्डीकर यांनी केला. बोर्डीकरांनी पवार संस्कारितांना expose केले.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यापासून राज्याचे तात्कालीन अन्न व नागरीपुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता
गेल्या 7 वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला. एका याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालायने नव्या प्रभार रचनेसह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक बातमी रविवारी समोर आली. या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवून घेतलेला नाही. यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
विशेष प्रतिनिधी अमरावती : Chief Minister नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथे पाठविल्यावर काेल्हापूर परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे. याबाबत सह्यांची माेहीम, माेर्चेही काढले जात […]
मुलींवर हात टाकणाऱ्यांची हिंमत वाढली आहे. पण, जे मुलींवर हात टाकतात, त्यांचे हातपाय तोडून नंतर पोलिसांकडे द्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी केले.
भाेंगे वाजविण्याची परवानगी काेणालाही नाही. मात्र, काही माफिया धर्माच्या नावावर भाेंगे वाजवित हाेते. पुढील तीन महिन्यांत महाराष्ट्र भाेंगेमुक्त हाेणार आहे.
शनिवारी, दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने हरियाणातील गुरुग्रामच्या शिकोहपूर गावात जमीन व्यवहार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि इतर आरोपींना नोटीस बजावली. पुढील सुनावणीपूर्वी न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी आरोपींना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होईल.
लांडगा आला रे आला म्हणून एकनाथ शिंदेंच्या हातून शिवसेना घेताहेत काढून हेच सत्य वकील असीम सरोदे यांच्या वक्तव्यातून समोर आले. पुढच्या महिन्यात शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टात लागतोय एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना निसटते आहे त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळणार नाही, असा दावा असीम सरोदे यांनी केला.
मालेगाव बॉम्बस्फोटातले सगळे आरोपी निर्दोष सुटले. सोनिया गांधी प्रणित काँग्रेसचा हिंदू दहशतवादाचा narrative उद्ध्वस्त झाला. याबद्दलचा संताप काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्त उमटला. त्यामुळे तामिळनाडूचे वारे महाराष्ट्रात आणले आणि पवार बुद्धीचे शिलेदार सनातन हिंदू धर्माला शिव्या देऊ लागले, असे महाराष्ट्रात घडून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या वाढत्या दादागिरी बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पुण्याच्या विकासातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तसेच, अशा दबावामुळे उद्योगपतींच्या खर्चावर आणि व्यवसाय धोरणावर परिणाम होतो, ज्यामुळे ते जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाहीत.
भगव्या दहशतवादाला भगवा दहशतवाद न म्हणता सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशत वाद म्हणा, असे विधान करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या विधानाचे देशाच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. विशेषतः मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेने मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला आहे.
अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यावरून फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जो कायद्याने राहतो, त्याला अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, कायदा न वाचता आलेली ही कॉमेंट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तुम्ही अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल, अशा शब्दात फडणवीसांनी सुनावले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाने 2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा निकाल दिला. पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.
मुंबईत ठाकरे बंधूंना स्ट्राईक, पुण्यात दादागिरीचा बाऊन्सर; फडणवीसांच्या खेळीने काँग्रेस + पवार क्लीन बोल्ड!!, असे महाराष्ट्राच्या राजकारणातले चित्र निर्माण झालेय.
महाराष्ट्रात राजकीय फेरमांडणी व्हावी आणि आपापल्या पक्षांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी दोन मोठ्या राजकीय हालचाली आज घडल्या. राजकीय पुनरुज्जीवनासाठी शेतकरी कामगार पक्ष ठाकरे बंधूंच्या दारी गेला, तर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड शरद पवारांना घरी जाऊन भेटून आले. दोन्ही ठिकाणी राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याने शेकाप आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांनी दोन राजकीय घराण्यांचा आश्रय घेतला.
शरद पवारांबरोबर जाऊन जयंत पाटलांना मिळाला धोका; म्हणून आता शेकापने ठाकरे बंधूंच्या बरोबर जाऊन श्रावणात बांधला राजकीय झोका!!, असे राजकीय चित्र आज रायगड जिल्ह्यात दिसले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी सांगितले की, संस्कृत ही भारतातील सर्व भाषांची जननी आहे. आता ती बोलली जाणारी भाषा बनवण्याची वेळ आली आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, संस्कृत केवळ समजली पाहिजे असे नाही तर ती कशी बोलायची हे देखील माहित असले पाहिजे.
रोहिणी खडसे यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेतली. सध्या पुणे रेव्ह पार्टी प्रकरणामुळे प्रांजल खेवलकर हे नाव चर्चेत असतानाच रोहिणी खडसे आणि शरद पवार यांची भेट ही देखील आता चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने एका पतीने आपल्या पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध दाखल केलेली मानहानीची तक्रार फेटाळून लावली आहे. घटस्फोटाच्या कारवाईदरम्यान पत्नीने आपल्या पतीला नपुंसक म्हटले, तर तिला मानहानी मानता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पुण्याच्या विकासात दादागिरी घुसलीय. आमच्याच लोकांना कंत्राटे द्या. आमच्याच लोकांना कामावर ठेवा. आम्ही सांगू त्याच पद्धतीने काम करा हा माईंडसेट बदलावा लागेल
३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लूकआउट नोटीस जारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अंबानी यांना तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी नाही. जर त्यांनी परदेशात प्रवास करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना विमानतळ किंवा बंदरांवर ताब्यात घेतले जाऊ शकते.
पुण्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App