देशात आर्थिक विकास होत असला, तरी त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही, हीच खरी चिंतेची बाब आहे, असे वक्तव्य करत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधले आहे.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र या मुद्द्यावरून संघाच्या प्रतिक्रियेवर वेगळाच narrative set करायचा प्रयत्न मराठी माध्यमांनी चालविल्याचे आज समोर आले. महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवायचा निर्णय घेतला. मात्र हिंदीची सक्ती केली, असा दावा करत विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. फडणवीस सरकारने तो अध्यादेश मागे घेतला. त्यामुळे आपला विजय झाल्याचा दावा करून ठाकरे बंधूंनी ऐक्य मेळावा घेतला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दिला. त्यावरून हिंदी सक्ती आणि राज्यांच्या भाषांवरचे प्रेम या विषयावर वेगळेच राजकारण सुरू झाले.
राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हॉटेल विट्सच्या वादग्रस्त लिलावप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटांच्या अटी व शर्ती मध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे आदेश दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करीत आहेत, अफवा पसरवत आहेत. या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. .
समविचारी पक्ष आणि काँग्रेसच्या मूल्यांना आदर देणारे पक्ष असतील, तरच काँग्रेस त्यांच्यासोबत युती करेल,” असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त करत राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात अपमानास्पद आणि शिवराळ भाषा वापरल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये हाके यांनी सात दिवसांच्या आत अजित पवार यांची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात न्यायालयात दिवाणी, फौजदारी आणि अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातले भाजपवाले ठाकरे बंधूंची दादागिरी नाकारतात, पण ते हिंदी भाषकांची मस्तवाल मुजोरी का खपवून घेतात??, असा सवाल महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भाजपवाल्या नेत्यांच्या राजकीय वर्तणुकीतून आणि वक्तव्यातून समोर आलाय.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पॉडकास्ट एक मालिका सुरू केली आहे. यात बोलताना त्यांनी वारीच्या इतिहासावर तसेच महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीबद्दल भाष्य केले आहे.
भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयी सभेवर टीका केली आहे. तसेच हे केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला कार्यक्रम असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एकत्र येत विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. या मेळाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता संजय निरुपम यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी नव्हे तर आता ठाकरे विकास आघाडी तयार झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये पार पडला. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले, आणि त्यांच्या भेटीने संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदी सक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबईत पार पडलेल्या विजयी रॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. भाषणात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘अणाजी पंत’ असा करत टोला लगावला. यावर शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारे उल्लेख करणे म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा अपमान असल्याचे केसरकर यांनी म्हटले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली असून, हाके यांनी सात दिवसांत अजित पवार यांची लेखी माफी मागावी, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा नितीन यादव यांनी दिला आहे.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने गोदावरी मातेची नित्य महाआरती पावसाळ्यातही अखंड सुरू ठेवण्याची परंपरा यंदाही पाळली गेली. काल नाशिकमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असतानाही ११ समर्पित गोदासेवकांनी पुराच्या पाण्यात उभे राहून महाआरती संपन्न केली.
ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा आशिष शेलार यांनाच पहिला राजकीय धोका, म्हणून केली हीन पातळीवर जाऊन टीका!!, असे आज घडले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री आशिष शेलार यांनी मनसेवर टीका करताना मनसैनिकांची तुलना पहलगाम मधल्या जिहादी दहशतवाद्यांशी केली. दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले तुम्ही भाषा विचारून हिंदूंना मारताय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा नाही, तर राजकीय विरोध असल्याचे दिसून येत आहे. ज्या ६२ गावांतून महामार्ग जात आहे यातील सर्वाधिक गावांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत. कोल्हापूरचा विकास होऊ नये, यासाठी काही राजकारणी प्रयत्न करत आहेत. त्यांचा विरोध डावलून लोकांच्या हितासाठी शक्तिपीठ मार्ग होणारच असल्याचा ठाम विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
डिलिव्हरी बॉयने तोंडावर स्प्रे मारून 22 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. पुणे आता सर्वसामान्य महिलांसाठी सुरक्षित असलेले शहर उरले नाही असा fake narrative पसरवायचे काम काही लोकांनी केले, पण पुणे पोलिसांनी संबंधित केसचा 24 तासांच्या आत निकाल लावून ती केसच खोटी असल्याचे सिद्ध केले, अशा परखड शब्दांमध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी fake narrative पसरवणाऱ्यांचा पर्दाफाश केला.
जुगाडाच्या पलीकडे जाऊन बांधावी लागेल मोठी संघटना, तरच ओलांडता येईल ठाकरे – पवार ब्रँडची संख्यात्मक मर्यादा!! ही वस्तुस्थिती दोन्ही नावांच्या ब्रँडला आता मान्य करावी लागेल.
राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील, अशा उपरोधिक सूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य केले आहे. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले, असे ते म्हणाले.
वरळी येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या मेळाव्यावर टीका करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवून दिला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणातून मराठी भाषेबाबतची तळमळ दिसली, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मात्र केवळ सत्ता, खुर्ची आणि स्वार्थाची मळमळ होती, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.
हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या ठाकरे बंधूंवर टीका करताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर लोटला असून चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.
ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मराठीच्या लढ्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळकमचे प्रमुख एम. के. स्टालिनने पाठिंबा दिला. पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सनातन धर्माला दिलेल्या शिव्या महाराष्ट्र ठाकरे बंधूंना चालतील का?? महाराष्ट्र ते खपपून घेईल का??, हे खरे कळीचे सवाल आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर यांच्यावतीने आयोजित ‘कृषी पंढरी’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले
परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App