नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेस रुग्णालयात दाखल करण्यासाठी तब्बल १० लाख रुपये मागण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर महिलेचा दुसऱ्या रुग्णालयात प्रसूती झाल्यावर दुर्दैवी मृत्यूनंतर निर्माण झालेल्या समाजातील संतापाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे ‘महसूल विभाग : कार्यशाळा 2025’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी COEP तंत्रज्ञान विद्यापीठ मैदान, पुणे येथे ‘डिपेक्स 2025 : अ स्टेट लेवल एक्झिबिशन-कम-कॉम्पिटीशन ऑफ वर्किंग मॉडेल्स’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध “देशद्रोही” टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा शनिवारी मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीच्या आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांनी एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्याचे निर्देश दिले. ज्यामुळे त्या भागांचा वेगाने विकास होईल आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करता येतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह कोळसा खाणीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोळसा उत्पादनापासून त्याच्या वापरापर्यंत प्रत्येक टप्प्याचे सखोल विश्लेषण करून सर्वोत्तम दर्जाचा कोळसा कमी खर्चात आणि योग्य वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील असून महाजनकोने गारे पेल्मा दोन (GPII) कोळसा खाणीसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्याद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांनी न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्यासह पोलिस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची आणि नवीन ‘रिफ्रेश कोर्सेस’ सुरू करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
महाराष्ट्रातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा आणि त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा
नाशिक : Waqf सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे उरलेले लळिताचे राजकीय कीर्तन अजून सुरू असून संसदेतल्या वादसंवाद असे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात उमटत आहेत. […]
तलाठ्यापासून मंत्रालयातून राज्याचा कारभार चालवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण ‘एक परिवार’ आहोत हे ध्यानात ठेवून न घाबरता जनतेची कामे करावी. अनवधानाने झालेली चूक माफ करता येते, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक जाणीवपूर्वक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या, असा कानमंत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना दिला.
उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना संजय निरुपम म्हणाले की, ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांना लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२५ च्या विरोधात मतदान करण्यास भाग पाडले. निरुपम म्हणाले की, ठाकरे यांनी त्यांच्या खासदारांना पाच वेळा फोन करून या विधेयकाविरुद्ध मतदान करण्याचे निर्देश दिले.
तीन दिवसांपूर्वी एका सभेत मनोज दादांना चक्कर आली होती. म्हणून तब्येतीची विचारपूस करावी, आतापर्यंत भेटलो नव्हतो. फक्त फोनवर चर्चा झाली. पुढे त्यांना काही आमची मदत हवी असेल, ताकद येण्यासाठी म्हणा, मी नक्कीच त्यांच्यासाठी उभी असणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणाबाबत पुढे काय दिशा ठरवायची, यावर चर्चा झाली असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले.
देशाच्या राजकीय वातावरणाचे भवितव्य ठरवणाऱ्या waqf सुधारणा विधेयकावरील चर्चेच्या वेळी (शप) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार राज्यसभेत गैरहजर राहिले.
हिंदुत्वाच्या नावाने उद्धव सेनेने दिल्लीत भलतेच चाळे केले. मुंबईत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्या चाळ्यांना पाठिंबा दिला, पण अजित पवारांचे खासदार मात्र मुकाटपणे waqf सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन मोकळे झाले.
waqf सुधारणा विधेयक काल मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने विधेयकाच्या विरोधात मतदान केले.
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली आहे. या याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर अनेकांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात.
केंद्रातले मोदी सरकार एकीकडे waqf सुधारणा कायदा मांडत असताना महाराष्ट्रातल्या राजकारणात “चुलत्याची कृपा” हा विषय अचानक चर्चेचा झाला. त्यावर अनेकांनी क्रिया – प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराभोवतीचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुंबई पोलिसांना या प्रकरणात कामराची चौकशी करायची आहे परंतु दोनदा समन्स मिळाल्यानंतरही कामरा हजर झालेला नाही. यानंतर, पोलिसांनी आता त्याला तिसरे समन्स बजावले आहे. त्याला ५ एप्रिल रोजी खार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून 25 वर्षे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीत गुंड, वाळू माफिया, राख माफिया यांची भरती केली, पण आता बीडमध्ये जाऊन अजितदादांना त्यांचीच झाडाझडती घ्यावी लागली. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा “इफेक्ट” बीडमध्ये आज दिसला.
बहुचर्चित आणि प्रतिक्षेत असलेले वक्फ दुरुस्ती विधेयक 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेत सादर केले जाणार आहे. मात्र, मुस्लीम समाजाकडून या विधेयकाला विरोध दर्शवण्यात येत आहे.
मी कुठेही नाराज नाही, माझ्यासारख्याला तुम्ही ओळखू शकले नाहीत, म्हणत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बीएसएनएल/एमएनटीएल लँड मॉनेटायझेशन, भारत नेटची स्थि
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App