राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आहे आणि म्हटले आहे की भारताला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या इतके शक्तिशाली बनवले पाहिजे, की जगातील एकत्रित शक्ती देखील त्याला पराभूत करू शकत नाहीत.
राजधानी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले
शरद पवारांनी स्थापन केलेल्या आणि “संस्कारित” केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीचे उपद्रवमूल्य आधी काँग्रेसला भोगावे लागले आणि आता ते भाजपला भोगावे लागत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांनी सध्या वेढलेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
लग्न नाही झाले, तरी संसार एकत्र करू लागले, अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ऐक्याची खिल्ली उडवली.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्यात घडणाऱ्या अनेक प्रकरणातील आरोपी हे अजित पवार यांच्या पक्षातले कसे? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे सात दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी आज सकाळी दोघांना स्वारगेट येथून ताब्यात घेतले. दुपारी त्यांना शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी पिता-पुत्राला न्यायालयात नेत असताना भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोपींच्या गाडीवर टोमॅटो फेकून संताप व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानचा व्हायरस शिरला आहे. त्यामुळे देशाला पाकव्याप्त काश्मीरपासून नव्हे तर पाक विचाराच्या काँग्रेसचा मोठा धोका आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेसवर निशाणा साधताना केला. भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला दाखवून दिले, असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे, ‘सांगली जिल्हा पोलीस’ आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी. त्यासाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘कन्व्हिक्शन रेट’ वाढवावा, असे निर्देश दिले.
महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूरवरील त्यांच्या वादग्रस्त विधानापासून माघार घेतली आहे आणि संपूर्ण प्रकरणासाठी माध्यमांना जबाबदार धरले आहे. विजय वडेट्टीवार यांनी काल सांगितले होते की, आम्ही १५ हजार रुपयांच्या ड्रोनसाठी १५ लाख रुपयांचे क्षेपणास्त्र डागले. सरकारने यावर उत्तर द्यावे. सर्व बाजूंनी घेरल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आणि मी जे बोललो ते एका संरक्षण तज्ञाचे मत असल्याचे सांगितले. मी त्यावरून म्हणालो होतो. हे माझे विधान नव्हते.
पुणे विभाग, मटणावर ताव, अटक झाल्यानंतरही राजेंद्र हगवणेच्या चेहऱ्यावर माज, हे सगळे आज दिसल्याने हेच का ते “राष्ट्रवादीचे संस्कार”??, असे विचारायची वेळ आली
वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात वैष्णवी चा सासरा राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी अखेर अटक केली. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्याच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच पोलिसांवर दबाव असल्याचे उघड झाले.
माझा सभासद असेल तर त्याची हकालपट्टी करतो. असली लोकं माझ्या पक्षात नकोत, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्याविषयी बोलताना अजित पवारांनी भाष्य केले आहे. असले नालायक लोक मला माझ्या पक्षात नकोत, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
पिंपरीतील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (ऑनलाईन) ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण आणि इतर प्रकल्पांचे उदघाटन’ केले. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे त्यापैकी एक रेल्वे स्थानक असलेल्या परळ, मुंबई येथील रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
एवढे “कडक” वागले, तरी अजितदादांची बदनामी, पण त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची चाल चलन आणि चरित्र माहिती नाहीत का??, असे विचारायची वेळ खुद्द अजितदादांच्याच वक्तव्यातून आली.
वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात सगळीकडून टीकेचा भडीमार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर जाग आली आपल्याला आता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला निलंबित करावेच लागेल अन्यथा पक्षाची आणखी बदनामी होत राहील
राज्य सरकारने शेतकऱ्यांचे हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता केवळ 200 रुपयात होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार आहे.
आपण काय बोलतो आणि त्याच्यावर समोरच्याची काय प्रतिक्रिया येऊ शकते याचे भान सुटलेला नेता, बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे, अशी टीका भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस
भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअपशक्ती बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आलेत. त्यामुळे भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात भाजपने आपल्या सत्तेच्या वळचणीला घेतलेल्या “पवार संस्कारितांचे” राजकीय उपद्रवमूल्य वाढत चालल्याचे पहिल्या सहा महिन्यांमध्येच समोर आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार “भाजपामय” होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला धोरण आणले. त्यांनी मुलीला मुलाप्रमाणे वाढविले. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
कल्याण पूर्व मधील मंगलराघो नगर परिसरात आज दुपारी एक हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली. सप्तशृंगी नावाच्या चार मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला आणि थेट तळमजल्यावर आदळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App