अमरावीतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा आपल्या 15 सेकंद पोलिस हटवा, या वक्तव्यावरून अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हैदराबाद कोर्टाने नवनीत राणा यांना समन्स बजावला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटिस बजावली आहे.
सहकार क्षेत्रात प्रगती करत असताना सहकारी बँकांनी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमे देत असताना या दोन्ही नेत्यांनी युद्धाचा ठामपणे इन्कार केला
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. आमच्या एका अभ्यासानुसार ही संख्या वर्षाला ३० ते ३५ लाख रुग्ण हे इतर राज्यातून येतात. याचा परिणाम म्हणजे या रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण संख्येमुळे, इथली व्यवस्था पार कोलमडली आहे आणि त्यामुळे मुंबईतील नागरिकांना उपचार मिळत नाहीत. हे चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचा पुरावा म्हणून आधारकार्डावरील पत्त्याच्या आधारे रुग्णांना मुंबईतील सरकारी रुग्णलयात सेवा पुरवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली.
दिल्लीतल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना खुर्चीत बसविले, त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला, याविषयी मराठी माध्यमांमध्ये सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एकाच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांना टोले हाणले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री यांनी भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी प्रथम राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जायला पाहिजे असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे मत आहे, असे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. माहीम विधानसभेला अमित यांचा पराभव झाला होता. मनसेच्या विधानसभा अध्यक्षांची एक बैठक अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात त्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्याचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने फसवणुकीच्या आरोपात (कलम ४२०) दोषी ठरवून २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५० हजार रुपये दंड ठोठावला.
राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटीरुपयांचा घोटाळा झाला आहे.वाल्मीक कराडने निविदा ठरवल्या,महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोपभाजप आमदार सुरेश धस यांनीकेला. गुरुवारी आष्टीत त्यांनीपत्रपरिषद घेतली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचाअधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनीस्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देतनाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडे पैसा, पद आणि राजकारणाला हपापलेला माणूस आहे. तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर राजकारण करतो. आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपल्यावर आरोप झाल्यानंतर पदांचा राजीनामा दिला आहे. पण हा माणूस एवढा हपापल्याला आहे की त्याला सत्तेतील खुर्ची सुटत नाही, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.
मराठा मुलीशी विवाह केल्यामुळे दलित तरुण विक्रम गायकवाड यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. शनिवारी (दि.22 फेब्रुवारी,) भोर तालुक्यातील उत्रोली या गावात भेट देऊन ऑनरकिलिंग चा बळी ठरलेल्या दिवंगत विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबियांची आपण सांत्वनपर भेट घेणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
कुठल्याही गरजू महिलेचे नाव लाडकी बहिण योजनेतून कमी केलेले नाही.योजनेसाठी जी महिला पात्र आहे तिला आम्ही लाभापासून कधीच वंचित ठेवणार नसल्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात यावे यासाठी आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्यात आले. त्यामुळे घाबरून अजित पवार गटात प्रवेश केला होता, असा धक्कादायक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक अभिजित पवार यांनी केला आहे.
बऱ्याच दिवसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आला पुन्हा “लकवा”; नेत्यांच्या वक्तव्यातून दिसली हतबलता!!प्रकाश आंबेडकरांनी आज बऱ्याच दिवसांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना लकवा झाल्याचा आरोप केला.
दिशा चुकू देऊ नका, भागवतांनी केले भाषण; पण “पवार संस्कारितांचे” कारनामे आलेत संघ संस्कारितांच्या अंगलट!!, असेच महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकार बाबत घडताना दिसले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख प्रकरणात आरोप झाले. त्या पाठोपाठ भ्रष्टाचाराच्या आरोपांनी देखील त्यांना घेरले, पण नेमके त्याच वेळी त्यांना bell’s palsy नावाच्या आजारानेही ग्रासले. धनंजय मुंडे असे सर्व बाजूने अडचणीत सापडले
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि फडणवीस सरकारमधील कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे त्यांची गाडी उडवून देण्याची धमकी दिली आहे. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी कारवाई केली आणि तपास सुरू केला.Eknath Shinde
संतोष देशमुख प्रकरण ते भ्रष्टाचाराचा चिखल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे अडकले असतानाच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा झाली. राष्ट्रवादीच्या या भ्रष्टाचाराचा भाजप महायुतीच्या फडणवीस सरकारला फटका बसला
औरंगजेबावर मात केलेल्या आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले, तर आईशप्पथ सांगतो ताजमहाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांपेक्षा आग्र्यातील शिवस्मारक पाहायला शिवप्रेमी गर्दी करतील, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत आहेत. यातच उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी पक्षाला घरचा आहेर देत मातोश्रीवर ताबा मिळवला असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पक्षाच्या वतीने आता त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत जय शिवाजी-जय भारत पदयात्रेचा शुभारंभ पुणे येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होणार, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप जोरकसपणे फेटाळले आहेत. अंजली दमानिया यांचे आरोप निव्वळ हास्यास्पद, मीडिया ट्रायल करणे व अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन आहे, असे ते म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यातील आंबेगाव येथे ‘शिवसृष्टी’च्या द्वितीय चरणाचे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत संबोधित केले.
महाराष्ट्रातले महायुती सरकार हे शासक नाही तर शिवछत्रपतींचे मावळे आहेत. शिवछत्रपतींच्या सगळ्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध आहे या किल्ल्यांवरची सगळी अतिक्रमणे आम्ही काढून टाकणार आहोत
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App