सध्या जगासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न असून, याचे थेट परिणाम मराठवाड्यात जाणवत आहेत. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू होऊन ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सात-सात वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, केवळ पिकेच नव्हे तर जमिनीही खरडून गेल्यामुळे रबीचे पीक घेणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला कडक इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अन्यथा किमान 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे तिप्पट नुकसानभरपाई द्या. दिवाळीपूर्वी ही मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी नीट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळेच वक्तव्य करून मोठ्या राजकीय वादाला फोडणी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नाशिक येथील जैन समाजाच्या ‘णमोकार तीर्थक्षेत्र’ येथे ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा’ आयोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करायची दानत नाही, पण काटामारी करून शेतकऱ्यांना फसवताय, तर तुम्हाला दाखवतो, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा मारी करणाऱ्या साखर कारखान्यांना गंभीर इशारा दिला.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याने खोटे प्रमाणपत्र जारी केले किंवा दाखला तयार केला, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन ओबीसी संघटनांना त्यांचा 10 तारखेचा प्रस्तावित मोर्चा रद्द करण्याचेही आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027’ संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
पुणे शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट पुणे पोलिस लवकरच रद्द करणार आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. घायवळने बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती सादर करून हा पासपोर्ट मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे.
महाराष्ट्रात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागू, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका करताना त्यांच्यावर भ्रष्टाचार, हिंदुत्वाचा त्याग आणि मुस्लिम तुष्टीकरणाचे गंभीर आरोप केले आहेत. रॅडिकल इस्लामिक फंडामेंटलिस्ट प्रयत्नांना बळकट देण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न असल्याचे अमित साटम म्हणालेत. तसेच 1997 ते 2022 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेत देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला. तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून त्यामागे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रशासनाचा थेट हात आहे, असा दावा अमित साटम यांनी केला.
मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी कनिष्ठ न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना भ्रष्ट आचरण व न्यायालयीन अधिकाऱ्यांना अनुरूप वर्तन न केल्याबद्दल बडतर्फ केले. शिस्तपालन समितीच्या चौकशीनंतर सातारा अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग इरफान शेख यांची बडतर्फी करण्यात आली.
युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरे यांना 35 वे वर्ष का लागले??, असे विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे आली.
मराठा आरक्षणाला विरोध करा हे राहुल गांधी (लाल्याने) विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचे दिसत आहे. काँग्रेस मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलताना दिसून येत आहे. मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर उपकार केले त्या उपकाराची परतफेड काँग्रेसकडून सुरू आहे, असे
पवार संस्कारित नेते एकमेकांची झाकतात आणि बाळासाहेब संस्कारित नेते एकमेकांचीच काढतात!!, पण राजकीय आरोप – प्रत्यारोपांमध्ये गुन्हे दडपून जातात असे चित्र महाराष्ट्रात दिसून राहिलेय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसानिमित्त’ अभिजात मराठी भाषा सप्ताह 2025 चे उदघाटन करण्यात आले. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मायमराठीला दिलेल्या अभिजात भाषेचा बहुमानाच्या गौरवशाली निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घडलेल्या घटनांवरून पुन्हा एकदा वादंग पेटला आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक दावा करत म्हटले की, “बाळासाहेबांचे सरण या लोकांनी आधीच रचले होते. त्या तयारीत विनायक राऊत आघाडीवर होते, हे नाव मी आज स्पष्ट करतो.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025’ चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले
विशेष प्रतिनिधी पुणे : Arun Lad : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पथसंचलनांचे शहरात मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले. संचलन मार्गावर विविध संस्थांकडून स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, तर नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली. पुणे महानगरातील ५५ नगरांमध्ये ५७ स्थानांवर घोष सहित संचलने झाली, ज्यामध्ये २३ हजार २१८ युवा स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Uday Samant : “नालायकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता दिली, तर शहराची वाट लागेल,” असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : Anil Parab : शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना आता ठाकरे गटाचे नेते अनिल […]
एकनाथ शिंदे यांनी गोरेगावातील दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत आणि थेट आरोप करत हल्लाबोल केला. त्यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरही शिंदेनी जोरदार टीका केली. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी नेला का? असा सवाल शिंदेंनी केला. तसेच एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सर्वच गमावले, अशी टीकाही शिंदे यांनी केली. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या शेजारी बसता. बाळासाहेब असते, तर उलटे टांगून धुरी दिली असती, असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्य सरकारांना कराचा आगाऊ हप्ता हस्तांतरित केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला 6 हजार 418 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त असून, राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी तसेच कल्याणकारी आणि विकास योजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने करण्यात आले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काल दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान साधलेच, पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या सकट अजित पवारांना सुद्धा घेरले. धनंजय मुंडे आणि अजित पवारांचे राजकारण संपविण्याची धमकी दिली.
मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आज पार पडला. मात्र, यंदाच्या मेळाव्यात एका प्रसंगामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही तरुणांच्या हातात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडे फोटो झळकले. यावरून अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्या निशाणा साधला आहे. पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना गॉन केस म्हटले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App