: पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या अशा गुंजवणी सिंचन प्रकल्पामुळे परिसरातील गावांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कामास गती देऊन हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबईतील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (BSE) फिरोज टॉवर इमारतीला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये इमारतीमध्ये चार आरडीएक्स आयईडी बॉम्ब ठेवले असल्याचा दावा करण्यात आला असून, सोमवार दुपारी ३ वाजता स्फोट होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते.
जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताच शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली.
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीला पाठिंबा या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरे यांनी जास्त सावध पवित्रा घेतला.
हो, नाही करता करता अखेर जयंत पाटलांनी 2633 दिवसांनी पद सोडले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला. 2 खासदारांचा भाजप मोठा होऊ शकतो
जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला कंपनीने भारतात अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या माध्यमातून भारतात ईव्ही सेगमेंटमध्ये एक नवे पर्व सुरू होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार अनेक प्रकरणांमुळे अडचणीत आले आहेत. संजय शिरसाट यांच्या नेतृत्वातील सामाजिक न्याय खात्यात तब्बल 1500 कोटींचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे टेंडर रद्द करण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबण हे निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फैसला येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात जून 2022 पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे. यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपासून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा निकालाबाबत दिलेल्या संकेतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, युनेस्कोच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत त्यांनी समाजाला आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.
सत्ताधारी शिवसेनेतील काही मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या वादग्रस्त वर्तनामुळे पक्षावर टीकेची झोड उठत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर कडक भूमिका घेत आपल्या मंत्री आणि आमदारांची कानउघाडणी केली आहे. काही मंत्र्यांना यापूर्वी बदनामीमुळे पद गमवावे लागले. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, तुमच्यावरही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा गंभीर इशारा शिंदे यांनी सोमवारी शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना दिला.
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.
राज्यात ३२८ नवीन दारू दुकानांचे परवाने देण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये, असा नियम आम्ही बनवला आहे. आता ज्यांना दारूचे दुकान काढायचे आहे आणि परवाना मिळवायचा आहे त्यांना विधिमंडळाला याबाबत पहिली सूचना द्यावी लागणार आहे. विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय दारू दुकानांचे परवाने दिले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
भाजप मधल्या टॅलेंट ची सुप्रिया सुळेंना चिंता;; पण खुद्द त्यांच्या टॅलेंटचा त्यांच्याच पक्षाला उपयोग का होईना??, असा सवाल सुप्रिया सुळे यांच्या आजच्या वक्तव्यातून समोर आला.
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. आमचा पक्ष अशा खालच्या थराचे कृत्य करत नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळले आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे की नाही, याविषयी संभ्रम वाढला असून त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात शरद पवारांच्या घरातूनच दोन परस्पर विरोधी वक्तव्ये समोर आली.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ येणार का??, असा सवाल विचारायची वेळ खुद्द अजित पवारांच्या वक्तव्याने आली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. अन्यथा माझ्या जिवावर हल्ला झाला होता, याला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेले विशेष जन सुरक्षा विधेयक हे संविधानाला न मानणाऱ्या शक्ती विरोधात कारवाई करण्यासाठी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वांनुमते ते मंजूर करण्यात आले असून कायदा न वाजता यावर टीका करणाऱ्यांनी एकदा कायदा वाचावा. कायदा समजून घेतल्यानंतर कोणीही या विधेयकावर टीका करणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या ऐतिहासिक नाटकाच्या पुण्यातील पहिल्याच प्रयोगात मोठा वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित या प्रयोगादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत गोंधळ घातला.
मागच्या सात महिन्यांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. शनिवारी त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी सातारा जिल्ह्यातील विधान परिषदेवरील आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती शरद पवारांनी केली, अशा बातम्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर झळकल्या.
महाराष्ट्रातल्या महापालिका जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही होवोत, 2025 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत घ्यावा लागणार हे लक्षात घेऊन महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापली राजकीय बांधबंदिस्ती सुरू केली, पण यातला महायुतीचा खरा फॉर्म्युला कुणीच सांगितला नाही, तो म्हणजे ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!, हा तो फॉर्म्युला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत विमानतळाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतला.
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाकडून अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या बातम्या आज सकाळपासून दुपारपर्यंत सगळ्या महाराष्ट्रभर फिरल्या. त्यानंतर बराच वेळाने शरद पवारांनी कालच नेमलेले राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला. करून जयंत पाटील आजही प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला नाही त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या चालवायला लावून कुणीतरी खोडसाळपणा केला, असा राग काढला.
पदमुक्त झाल्यावर जयंत पाटलांभोवती घट्ट झाले संशयाचे जाळे; अनेकांना करावे लागताहेत वेगवेगळे खुलासे!!, अशी अवस्था राष्ट्रवादीचे पदमुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भोवती तयार झालीय.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App