• Download App
    Pravin Wankhade | The Focus India | Page 70 of 1500

    Pravin Wankhade

    Maharashtra : बारावी परीक्षेसाठी राज्यात 15.32 लाख विद्यार्थी नोंदणी:3,387 केंद्रांवर 10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान परीक्षा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी यंदा १५ लाख ३२ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान राज्यातील ३ हजार ३८७ मुख्य केंद्रांवर घेतली जाईल. मंडळाचे प्रभारी अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

    Read more

    Nitesh Rane : महायुतीच्या नावावर कमळ पाडणाऱ्यांना सोडणार नाही; अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, नीतेश राणेंचा बंडखोरांना इशारा

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी, अंतर्गत गटबाजीवरून राजकीय वातावरण तापले आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सिंधुदुर्गाच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, मात्र काही लोकांनी महायुतीत राहूनच ‘कमळ’ पाडण्याचे काम केले,” असा खळबळजनक आरोप मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विशेषतः सावंतवाडी येथील बंडखोर अपक्षांच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वपक्षातील आणि महायुतीतील काही नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे.

    Read more

    India-Pakistan Match : ICCने पाकिस्तानच्या तीन अटी फेटाळल्या; फायनल अल्टीमेटम दिला, PCB यू-टर्न घेणार; भारताविरुद्धचा विश्वचषक सामना जवळजवळ निश्चित

    टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता वाढली आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) सोबत बैठक घेतली. आयसीसीने पाकिस्तानच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या आणि अंतिम अल्टिमेटम दिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबी आता यू-टर्न घेईल आणि त्यांचा संघ १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये भारताशी सामना करेल.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार, प्रकृती स्थिर; सततच्या दगदगीमुळे तब्येत खालावल्याची माहिती

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आज अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची प्रकृती काहीशी ढासळली होती. त्यामुळे ते आज अजित पवारांच्या तेराव्याच्या कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. पण तब्येत फारशी सुधारणा न झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    Read more

    PM Modi : महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे अभिनंदन; महाराष्ट्राने पुन्हा आम्हाला पाठिंबा दिला, PM नरेंद्र मोदींची ट्विट करत ZP निकालावर प्रतिक्रिया

    राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजप व महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप पुन्हा एकदा नंबर वनचा पक्ष बनला आहे. या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Fadnavis : ZPच्या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व; विरोधकांमध्ये लढण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव, देवेंद्र फडणवीसांचा टोला

    जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि विशेषतः भाजपला बहुतांश ठिकाणी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत देखील महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. तर पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले आहे. या निवडणुकांच्या निकालांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Rahul Gandhi : प्रकाशनापूर्वीच नरवणे यांच्या पुस्तक वितरणामुळे FIR दाखल; राहुल हे पुस्तक घेऊन संसदेत पोहोचले होते

    दिल्ली पोलिसांनी माजी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या वितरणासंदर्भात एफआयआर नोंदवला आहे. ही कारवाई वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि ऑनलाइन न्यूज फोरमवर समोर आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली, ज्यात पुस्तकाची प्री-प्रिंट प्रत प्रसारित होत असल्याचा दावा करण्यात आला होता.

    Read more

    Solapur EVM : सोलापुरात ढाब्यावर सापडलेल्या ईव्हीएमप्रकरणी आयोगाची कारवाई; राखीव ईव्हीएम मतदानातील नसल्याचा खुलासा

    सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ उडाल्यानंतर आयोगाने हे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Read more

    ZP elections results : भाजपच नंबर 1; अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा; 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता!!

    भाजपच नंबर 1; अजितदादांच्या राष्ट्रवादीला सहानुभूतीचा फायदा; 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता!!

    Read more

    Ramesh Chandra : बांगलादेशात हिंदू नेत्याचा कारागृहात मृत्यू; कुटुंबाचा आरोप- वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने जीव गेला

    बांगलादेशातील तुरुंगांमध्ये बंद असलेल्या कैद्यांशी होणाऱ्या वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवामी लीगचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि खासदार रमेश चंद्र सेन (८६) यांचा शनिवारी रात्री न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. ते सुमारे १८ महिन्यांपासून तुरुंगात होते आणि दीर्घकाळापासून आजारी होते.

    Read more

    अजितदादांची पायाभरणी आणि नंतरची सहानुभूती यामुळे पुणे जिल्ह्यात चालली राष्ट्रवादीची हवा, भाजपनेही दिला होता “बाय”!!

    जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर निकालांपैकी 43 जागा जिंकल्या. त्यांनी बहुमताचा आकडा आधीच पार केला.

    Read more

    New Income Tax : नवीन आयकर नियमांचा मसुदा जारी; नियमांची संख्या 511 वरून 333 पर्यंत कमी झाली; 1 एप्रिलपासून नवीन प्रणाली लागू

    आयकर विभागाने शनिवारी ‘इनकम टॅक्स रूल्स, 2026’ चा नवीन मसुदा जारी केला आहे. हे नवीन नियम पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. सरकारचा उद्देश कर भरण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि सामान्य करदात्यांसाठी नियम सुलभ करणे हा आहे.

    Read more

    PM Modi : मोदी म्हणाले- दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही; तमिळ भाषा भारत – मलेशियाला जोडते

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मलेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पेरदाना पुत्रा भवन येथे औपचारिक स्वागत आणि गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. स्वागत समारंभानंतर पंतप्रधान मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली.

    Read more

    Trump : ट्रम्प यांनी रशिया-युक्रेनला अंतिम मुदत दिली; म्हणाले- जूनपर्यंत करार करा, झेलेन्स्की म्हणाले- जमिनीवरून वाद कायम

    अमेरिकेने युक्रेन आणि रशिया यांच्यातील सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी जूनपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

    Read more

    ग्रामीण महाराष्ट्र शरद पवारांना “मानतो”, हे मिथक जिल्हा परिषद निकालांनी उद्ध्वस्त; अजितदादांच्या ब्रँडची देखील मर्यादा स्पष्ट!!

    ग्रामीण महाराष्ट्र शरद पवारांना “मानतो”, हे राजकीय मिथक जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांनी उद्ध्वस्त केले; त्याचवेळी अजितदादांच्या ब्रँडची देखील मर्यादा या निकालांनी स्पष्ट केली.

    Read more

    Dalai Lama : दलाई लामा कार्यालयाने एपस्टीन फाइल्सशी संबंध नाकारला; सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांवर खुलासा

    जगातील बहुचर्चित ‘एपस्टीन फाइल्स’ सेक्स स्कँडलमध्ये आता बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे नावही जोडले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दलाई लामा यांचा संबंध अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी असल्याचे सांगितले जात होते. या दाव्यांवर दलाई लामा यांच्या कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.

    Read more

    प्रफुल्ल पटेल, तटकरेंना चिल्ले पिल्ले म्हणून हिणवणाऱ्या उत्तम जानकारांच्या मुलाचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव, तो देखील राम सातपुतेंच्या पत्नीकडून!!

    प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चिल्ले पिल्ले असा उल्लेख करून त्यांना हिणवणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांना आपल्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा निवडून आणता आले नाही.

    Read more

    ‘कुत्रा-मुक्त गाव’च्या नावाखाली हत्या; तेलंगणात 1600 कुत्र्यांना मारले

    तेलंगणातील गावांमध्ये आता एक विचित्र शांतता आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत गावात एखादा अनोळखी व्यक्ती आला की, भटके कुत्रे भुंकून-भुंकून गावाला सावध करत असत. आता इथे कोणतीही हालचाल होत नाही. ही परिस्थिती केवळ एकाच गावाची नाही. राज्यातील सहा जिल्ह्यांमधील 12 हून अधिक गावांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 1600 हून अधिक कुत्रे मारल्याचे आरोप समोर आले आहेत. सुरुवातीला ही संख्या कमी होती. हळूहळू हा आकडा वाढत गेला.

    Read more

    12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये अजितदादांच्या एक्झिटच्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला; शिंदे सेनेला मागे सारून दोन नंबरचे स्थान!!

    जिल्हा परिषद निवडणुकांच्या पहिल्या कलांमध्ये तरी अजित दादांच्या अकाली एक्झिटच्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याचे दिसून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सेनेला मागे सारे राज्यात दुसऱ्या नंबरचे स्थान मिळवल्याचे दिसून येत आहे.

    Read more

    Assam CM : गौरव गोगोईंचे प्रकरण गृह मंत्रालयाकडे पाठवणार आसाम सरकार; मुख्यमंत्री हिमंतांचे आरोप

    आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप केला की, काँग्रेस खासदार गौरव गोगोई आणि त्यांची पत्नी एलिझाबेथ पाकिस्तानी एजंट अली तौकीर शेख यांच्या खूप जवळ आहेत. एका पाकिस्तानी फर्मने गौरव यांच्या पत्नीला नोकरी दिली, त्यानंतर त्यांना भारतात ट्रान्सफर केले. या कामासाठी पगार अली तौकीर शेखच देत होता.

    Read more

    Chhagan Bhujbal : तेलंगणात महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना; भुजबळांचे शाहांना पत्र, कारवाई करण्याची मागणी

    तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महात्मा फुलेंचा अपमान हा देश कदापि सहन करणार नाही,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी इशारा दिला आहे.

    Read more

    Vijayapura : कर्नाटकात खासगी प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळले; दोन्ही वैमानिकांनी उडी मारून जीव वाचवला

    कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यात रविवारी एका शेतात खासगी प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. जमिनीवर कोसळण्यापूर्वीच दोन्ही वैमानिकांनी इजेक्ट केले. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना बालेश्वर परिसरातील मंगळूर गावात घडली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे.

    Read more

    Russia Knife Attack : रशियाच्या मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात चाकू हल्ला:4 भारतीय विद्यार्थ्यांसह 6 जखमी; 15 वर्षांचा आरोपी अटक

    रशियाच्या बश्कोर्तोस्तान रिपब्लिकमधील उफा शहरातील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात शनिवारी अनेक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह किमान सहा जण जखमी झाले. भारतीय दूतावासाने याला एक दुर्दैवी घटना म्हटले आहे.

    Read more

    Japan Election : जपान निवडणूक, पंतप्रधान ताकाइची म्हणाल्या- हरले तर राजीनामा देईन; 465 पैकी 300 जागा मिळण्याची अपेक्षा; ट्रम्प यांचाही पाठिंबा

    जपानमध्ये रविवारी लोअर हाऊससाठी मतदान सुरू झाले आहे, ज्यात पंतप्रधान साने ताकाइची यांना मोठा विजय मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, देशाच्या अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे रविवारी 27 ते 28 इंचपर्यंत बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

    Read more

    Shinde : शिंदे पवारांच्या मदतीने फडणवीसांना आव्हान देणार; उद्धव ठाकरेही भाजपसोबत जाणार, लक्ष्मण हाके यांच्या दाव्याने राजकीय खळबळ

    2029 च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे शरद पवारांशी संधान साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपला आव्हान देतील. तसेच उद्धव ठाकरेही पवारांची साथ सोडून भाजपसोबत जातील, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रविवारी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

    Read more