विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी मध्ये मध्ये अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माफी मागितली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील सुनावून घेतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या शेजारी बसला होत्या.Chief Minister apologizes to citizens stuck in Mumbai-Pune traffic jam
– सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत
आज एक मे महाराष्ट्र दिन आणि सलग सुट्ट्या यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मुंबई आणि पुण्याच्या दिशेने गेले. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडी मध्ये खासदार सुप्रिया सुळे देखील अडकल्या. त्यांनी वाहतूक कोंडी मधूनच एक व्हिडिओ जारी करून राज्यातल्या फडणवीस सरकारच्या वाहतूक व्यवस्थापनावर टीका केली.
– देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेची दखल घेतली. सुप्रिया सुळे या वाहतूक कोंडी अडकल्या होत्या. त्यांनी व्हिडिओ जारी करून सरकारपर्यंत संदेश पोहोचवला तो आमच्यापर्यंत पोहोचला पण सुप्रिया सुळे याच शेवटच्याच वाहतूक कोंडीत अडकल्या. इथून पुढे त्या वाहतूक कोंडी मध्ये अडकणार नाही कारण आमच्या सरकारने आजच मिसिंग लिंकचे उद्घाटन केले. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे या रस्त्यावर इथून पुढे वाहतूक कोंडी होणार नाही. त्यांचे सरकार ज्यावेळी होते, तेव्हा त्यांच्या सरकारने मिसिंग लिंकचे काम अडवून ठेवले होते, पण आमच्या सरकारने तो अडथळा दूर करून मिसिंग लिंकचे काम पूर्ण केले, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांचे लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या हाताला बसल्या होत्या.
– कनेक्टिंग लिंक
याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांची माफी मागितली. त्याचवेळी त्यांनी मिसिंग लिंक संदर्भात सर्व महत्त्वाची तांत्रिक आणि वाहतुकी संदर्भातली माहिती दिली. इथून पुढे मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक असे म्हणावे अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
Chief Minister apologizes to citizens stuck in Mumbai-Pune traffic jam; Supriya Sule also apologized after the inauguration of the Missing Link!!
महत्वाच्या बातम्या
- Punjab : पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट पाकिस्तानने घडवला, मालगाडी जाताना स्फोट, बॉम्ब लावणाऱ्याचे तुकडे
- White House : व्हाईट हाऊस डिनर गोळीबार; आरोपीवर अध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप
- बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये प्रादेशिक घराणेशाहीला दणका; राष्ट्रीय पक्षांना फायदा!!
- KEM : ‘केईएम’चे नामांतर होणार; मुंबई मनपा प्रशासनाचा हिरवा कंदील; ठाकरे शिवसेनेच्या विरोधानंतरही लोढांच्या मागणीला यश