महाराष्ट्रात मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; प्रशासनाच्या बरोबर काम करायची मोठी संधी
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे
राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा येथे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळालेल्या 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात चाव्यांचे वाटप केले.
पश्चिम आशियातील युद्ध संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले. या आवाहनानुसार ते स्वतः वागले. त्यांनी आपल्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. पंतप्रधान मोदींचे बाकीच्या राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अनुकरण केले. मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या. इंधन बचतीचे इतर मार्गही अवलंबले.
केरळ मध्ये काँग्रेसचा साबण अजूनही स्लो; मुख्यमंत्री निवडायचे घोंगडे दिल्लीत ठेवले भिजत!!, हेच राजकीय चित्र केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी मध्ये मध्ये अडकलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माफी मागितली. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रिया सुळे यांना देखील सुनावून घेतले. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या शेजारी बसला होत्या.
देशातील सामाजिक आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे बदल होतील, अशी 17 एप्रिलला अपेक्षा होती. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होतं. सर्वजण मदत करण्याची अपेक्षा होती.
अष्टपैलू सूर हरपला. आशा भोसले यांनी आज एक्झिट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून आशाताईंच्या आठवणी जागविल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस आयुक्त यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. यामध्ये नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी करून भल्या भल्या गुंडांना गजाआड करणारे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पा’चे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला’तील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण पार पडले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 14 चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांची चावी आणि ताबापत्राचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 51 लाख कोटी रुपयांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युरोपमधल्या ऑस्ट्रिया आणि पूर्व आशियातल्या काही देशांना महाराष्ट्र आणि मागे टाकल्याचे आकडेवारीनिशी स्पष्ट केले
महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये शेती क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा आज महाराष्ट्र शासनाने विधिमंडळात बोलवून सन्मान केला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत सुद्धा या महिलांनी आपला आत्मविश्वास न गमावता शेती क्षेत्रात बहुमूल्य योगदान केले. नवीन प्रयोग करून सगळ्या महाराष्ट्राला अनमोल प्रेरणा दिली, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ग्वाही दिली.
केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी वैजनाथ, बीड येथे आयोजित ‘महा पशुधन एक्स्पो 2026’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली.
एकीकडे पवार गटाने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा गदारोळ सुरू केला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकीत सहभागी झाल्या.
स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय कंपन्यांशीच दावोस मध्ये जाऊन करार केल्याचा आरोप शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांनी केला होता. प्रत्यक्षात युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्यांशी महाराष्ट्राने तिथे करार केले.
पश्चिम बंगालमधील राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या विद्यापीठांमधील प्रशासकीय बदलांबाबतचा वाद अधिकच वाढला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्या सुधारणा विधेयकांना मंजुरी देण्यास नकार दिला आहे, ज्या अंतर्गत राज्यातील विद्यापीठांमध्ये कुलपती पदावर राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली होती.
महाराष्ट्र सरकारने विदर्भ-मराठवाड्याला थेट मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची उभारणी केल्यानंतर नागपूर गोवा या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून नागपूर ते पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यातील उर्वरित भागासह अहिल्यानगरला मुंबईला जोडण्यासाठी कल्याण ते लातूर हा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केला.
माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत,” या विधानावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सारवासारव केली आहे. “ते विधान मी ओघात बोललो होतो. तिजोरी माझ्या किंवा कुणाच्या बापाची नाही, ती जनतेची आहे. तसेच माझ्यापेक्षा जास्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच आहेत,” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ विकसन करणे या कामाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2027’च्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही विशेष सूचना केल्या. त्याचबरोबर त्यांनी 5000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामांचे भूमिपूजनही केले.
राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात घेवून श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा.
दक्षिण भारतीय अभिनेता विजय थलपथीच्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) या पक्षाने बुधवारी महाबलीपुरम येथील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी विजयला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यात आले. पक्षाने त्याला निवडणूक युतीबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकारही दिले.