35 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळायची अफवा; सरकारचा स्पष्ट शब्दांत खुलासा!!
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
गेल्या काही दिवसांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये पसरत असलेल्या बातम्यांनी ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते
सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात.
स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजितदादांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता, की रोहित पवारांना शरद पवारांचा पक्ष ताब्यात घ्यायचाय??, असा सवाल रोहित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आणि सोशल मीडिया पोस्ट मुळे समोर आला.
दिल्लीच्या सत्ताकेंद्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत वेदना आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्यामुळे 79 वर्षीय सोनिया गांधी यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली निरीक्षणात ठेवण्यात आले असून सध्या
राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता मार्च महिना संपत आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस गेल्या आठ दिवसांपासून हजेरी लावत आहे. दुसरीकडे उष्णतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.
राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध दगडखाणी आणि गौण खनिज उत्खननावर लगाम घालण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, गौण खनिज क्षेत्रातील मागील पाच वर्षांतील उत्खननाचे तीन महिन्यांत ईटीएस (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट सिस्टीम) द्वारे सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणानंतर अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटना चिंताजनक असून, याबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत मंगळवारी केली. ‘झीरो अवर’मध्ये वाढत्या मानवी तस्करीबाबत मेधा कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित करीत या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरकारने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असे त्यांनी म्हटले.
भारतात आता स्वयंपाकाच्या गॅसचे (LPG) अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल वापरण्याची तयारी सुरू आहे. सरकार इथेनॉल-आधारित कुकिंग स्टोव्ह (चूल) बनवण्यावर काम करत आहे.
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले. त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केला, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुणे परिसरात विराट हिंदू संमेलनांचा धडाका लावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुण्याच्या परिसरातील नव्या वस्त्या आणि वसाहतींमध्ये मोठा जनसंपर्क साधला.
अजित पवार यांच्या अपघातानंतर 2 महिने झाली तरी तपास अधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र दिलेले नाही, सीआयडीकडे काय चाललयं हे माहिती नाही. राज्यात आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेही झालं नाही, पण कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो.
पुणे महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्प आज महापालिकेच्या मुख्य सभेत सादर करण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी १५,६६९ कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडले. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी यापूर्वी १३,९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, त्यात स्थायी समितीने १,६७४ कोटी रुपयांची भर टाकून पुणेकरांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा केल्या आहेत.
वाराणसीमध्ये शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी चतुरंगिणी सेना स्थापन करण्याची घोषणा केली. ते म्हणाले – चतुरंगिणी सेनेत 2 लाख 18 हजार 700 सैनिक असतील. यात देशभरातून लोक भरती होतील.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया म्हणाले की, न्यायव्यवस्थेचा काही भाग ‘राजापेक्षा अधिक निष्ठावान सिंड्रोम’ने ग्रासलेला आहे. म्हणजेच, हे भाग राजापेक्षाही अधिक निष्ठावान असण्याची प्रवृत्ती स्वीकारत आहेत. यामुळेच लोक महिनोनमहिने तुरुंगात सडत राहतात. न्यायमूर्ती भुईया यांनी हे विधान रविवारी बंगळुरू येथे झालेल्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान केले.
आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केले, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या स्मार्ट बसची पाहणी केली आणि त्यामधून प्रवास केला.
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम येथे भगवान श्रीरामाची मूर्ती तोडल्याने वाद वाढत आहे. भाजप नेते दिलीप घोष यांनी सोमवारी सांगितले की, बंगालची अवस्था बांगलादेशसारखी झाली आहे. तेथे मंदिरे तोडणे आणि मंदिरांमध्ये चोऱ्या होणे ही सामान्य बाब आहे. हे सर्व ममता बॅनर्जींच्या संरक्षणाखाली होत आहे.
निवडणूक आयोगाच्या एका दस्तऐवजावर भाजपची सील लागलेली आढळली आहे. सीपीआय (एम) केरळने याला निवडणूक संस्थांच्या निष्पक्षतेसाठी धोका म्हटले आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर भाजपची सील होती. हा केवळ योगायोग नाही आणि यामुळे संस्थांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धाचे संपूर्ण जगावर दुष्परिणाम झालेत हे युद्ध आणखी सुरू राहिले तर आणखी दुष्परिणाम होतील आणि त्याचा भारतावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होईल
सोमवारी लोकसभेत पश्चिम आशियातील संघर्षमय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, तेथील सद्यस्थिती ही चिंतेचा विषय बनली आहे. देशाला इंधन (तेल आणि वायू) संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने, आम्ही आता ४१ देशांकडून इंधनाची आयात करत आहोत; यापूर्वी ही आयात केवळ २७ देशांकडून केली जात असे.
भोंदू बाबा अशोक खरात बरोबर “पवार संस्कारितांचे” कारनामे; पण सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस तर दाभोळकरांचा वारसा सांभाळणारे!!, असला प्रकार आज समोर आला.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा राजकीय इतिहासाविरुद्ध जाणारा दावा समोर आलाय.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीच्या घुमटावर राष्ट्रीय चिन्ह लावण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, हा मुद्दा न्यायिक नसून, तर प्रशासकीय स्तरावर विचार करण्याचा विषय आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 6, फ्लॅगस्टाफ रोड येथील सरकारी निवासस्थानाच्या नूतनीकरणावर ठरलेल्या अंदाजित खर्चापेक्षा सुमारे 342% जास्त खर्च करण्यात आला. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालात हे उघड झाले आहे.