• Download App
    OCI registration नागरिकत्व प्रक्रियेत मोठा बदल, OCI नोंदणी पूर्णपणे डिजिटल; सरकारचे नवे नियम लागू

    OCI registration : नागरिकत्व प्रक्रियेत मोठा बदल, OCI नोंदणी पूर्णपणे डिजिटल; सरकारचे नवे नियम लागू

    OCI registration

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : OCI registration केंद्र सरकारने परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, OCI (Overseas Citizen of India) नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या बदलामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.OCI registration

    गृह मंत्रालयाने केलेल्या सुधारणांनुसार, OCI नोंदणीसाठी आता कागदपत्रांची पारंपरिक पद्धत जवळपास संपुष्टात येत असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांना दूतावास किंवा कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.OCI registration



     

    अर्ज प्रक्रिया अधिक सोपी; जागतिक स्तरावर एकसमान प्रणाली

    नवीन नियमांनुसार OCI अर्जासाठी एकसमान शुल्क प्रणाली लागू करण्यात आली आहे. परदेशातून अर्ज करणाऱ्यांसाठी सुमारे $275 शुल्क निश्चित करण्यात आले असून प्रक्रिया अधिक सुसंगत करण्यात आली आहे.

    यासोबतच, अर्जदारांना भारतात सहा महिने राहण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि भारतीय नागरिकांचे परदेशी जोडीदार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    पूर्ण डिजिटल ट्रॅकिंग; कडक नियमही लागू

    सरकारने प्रक्रिया सुलभ करताना नियमही कडक केले आहेत.

    नवीन नियमांनुसार, OCI धारकांनी पासपोर्ट बदलल्यानंतर तीन महिन्यांच्या आत त्याची माहिती ऑनलाइन अपडेट करणे बंधनकारक आहे. ही मुदत चुकल्यास दंड आकारला जाईल.

    तसेच, सर्व अर्ज आणि अपडेट्स ऑनलाइनच करावे लागणार असून कागदपत्रांची पोस्टद्वारे सादर करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.

    प्रवास प्रक्रियेतही बदल; ‘e-Arrival’ अनिवार्य

    डिजिटल प्रक्रियेचा भाग म्हणून भारतात येणाऱ्या सर्व OCI धारकांसाठी ‘e-Arrival Card’ भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
    यामुळे विमानतळांवरील कागदी प्रक्रिया संपुष्टात येणार असून प्रवेश प्रक्रिया अधिक जलद होणार आहे.

    पात्रतेचा विस्तार; पण नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

    सरकारने OCI साठी पात्रतेचा विस्तार केला असला, तरी नियमांचे पालन अधिक कडक करण्यात आले आहे.

    नवीन प्रणालीत अर्ज प्रक्रिया वेगवान होणार असली, तरी माहिती चुकीची असल्यास किंवा अपडेट वेळेवर न केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

    citizenship process, OCI registration completely digital; Government’s new rules implemented

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका