OCI registration : नागरिकत्व प्रक्रियेत मोठा बदल, OCI नोंदणी पूर्णपणे डिजिटल; सरकारचे नवे नियम लागू
केंद्र सरकारने परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, OCI (Overseas Citizen of India) नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या बदलामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.गृह मंत्रालयाने केलेल्या सुधारणांनुसार, OCI नोंदणीसाठी आता कागदपत्रांची पारंपरिक पद्धत जवळपास संपुष्टात येत असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांना दूतावास किंवा कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.