• Download App
    Trinamool's Jehangir Khan's bullying again in West Bengal's Falta constituency; Voters were harassed even during re-voting पश्चिम बंगालच्या फाल्टा मतदारसंघात तृणमूलच्या जहांगीर खान ची पुन्हा दादागिरी; फेरमतदानाच्या वेळी सुद्धा मतदारांना दमदाटी

    पश्चिम बंगालच्या फाल्टा मतदारसंघात तृणमूलच्या जहांगीर खान ची पुन्हा दादागिरी; फेरमतदानाच्या वेळी सुद्धा मतदारांना दमदाटी

    Jehangir Khan

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगाल मधल्या डायमंड हार्बर स्थित फाल्टा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचा उमेदवार जहांगीर खान याने आधी दादागिरी केलीच होती. पण आज 11 बुथ वरील फेरमतदानाच्या वेळी सुद्धा त्याच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना दमदाटी केली. त्यामुळे त्या मतदारसंघातल्या हिंदू मतदारांनी रस्त्यावर उतरून जहांगीर खान आणि त्याच्या कार्यकर्त्यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. तिथे केंद्रीय सुरक्षा दलांना तैनातीसाठी बोलविणे भाग पाडले. Trinamool’s Jehangir Khan’s bullying again in West Bengal’s Falta constituency; Voters were harassed even during re-voting

    फाल्टा मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार जहांगीर खान याच्या दादागिरी विरुद्ध आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांनी कठोर इशारा दिला होता. त्यानंतर जहांगीर खान याने खेला तुमने शुरू किया है, खतम हम करेंगे अशी उलटी दमबाजी केली होती. त्यानंतर तिथल्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले, पण त्या मतदानाच्या वेळी प्रचंड गोंधळ झाला. जहांगीर यांच्या कार्यकर्त्यांनी सहकारी अधिकाऱ्यांसमोर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वरील भाजपच्या उमेदवाराच्या नावासमोर चिकटपट्ट्या लावून ते बंद केले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मतदानाच झाले नाही.



    निवडणूक आयोगाने या सगळ्या गैरप्रकाराची दखल घेऊन तब्बल 11 बूथ वर फेरमतदान घ्यायचे आदेश दिले. त्यानुसार, आज मतदान सुरू झाले. परंतु काही वेळातच तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी सुरू केली. जहांगीर खानचे कार्यकर्ते बुध और पोहोचले. त्यांनी मतदारांना दमदाटी करून मारहाण केली. त्यामुळे मतदारांनी संतप्त होऊन केंद्रीय पोलीस यंत्रणांकडे भरपूर तक्रारी केल्या. बुथवर केंद्रीय पोलीस यंत्रणा तैनात झाली. तरीसुद्धा संतप्त मतदारांचा संताप आवरणे कठीण झाले होते. केंद्रीय पोलिस यंत्रणांनी हस्तक्षेप करून मतदान व्यवस्थित सुरू ठेवले.

    Trinamool’s Jehangir Khan’s bullying again in West Bengal’s Falta constituency; Voters were harassed even during re-voting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pawan Khera : सर्वोच्च न्यायालयाने पवन खेरा यांना अग्रिम जामीन मंजूर केला; म्हटले – न सांगता भारत सोडू नका

    Oil companies : तेल कंपन्यांनी 2025-26 मध्ये दररोज ₹116 कोटी नफा कमावला; या काळात कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर होते

    E-Prapati : बंद पडलेले PF खाते ट्रॅक करण्यासाठी ‘ई-प्राप्ती’ पोर्टल येणार; UAN नंबरशिवायही पैसे काढता येतील, मासिक पेन्शन ₹7500 पर्यंत वाढू शकते; संसदीय समितीची मंजुरी