पवारांच्या लेखी नातवाची किंमत कवडीची आणि सून बाहेरची!!


शरद पवारांची प्रतिमा त्यांचे समर्थक कितीही पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि स्त्री – पुरुष समतेचे आणि सामाजिक समतेचे पाईक अशी रंगवत असले, तरी प्रत्यक्षात पवारांची मूलभूत भूमिका ही राजकीय नेत्याच्या पलीकडच्या सामाजिक सुधारकाची नाहीच, हे लेखाच्या शीर्षकावरून स्पष्ट होते. ज्यावेळी आपले सगळे राजकारण स्वतःच्याच गळ्याशी येते, त्यावेळी पवार किती आणि कशी प्रतिगामी भूमिका घेत असभ्यपणे बोलू शकतात, याचे वर दिलेले शीर्षक हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. Sharad pawars original regressive social approach for his ambitions

2019 च्या निवडणुकीच्या काळात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याबाबतीत असेच उदाहरण घडले होते. पवारांनी अत्यंत नाखुशीने त्यावेळी पार्थ पवारांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, पण पार्थ पवार मोदी लाटेत मावळ मधून पडले आणि खऱ्या अर्थाने “पवार” नावावर लोकसभा निवडणुकीत पहिला पराभव नोंदविला गेला होता. त्याचे शल्य पवारांना बोचले.



त्यानंतर पार्थ पवारांनी थोडी भूमिका बदलली आणि ते भाजपला अनुकूल वागू लागले. त्यावेळी पवार खऱ्या अर्थाने चिडले आणि पवारांना पार्थ पवारांसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना आम्ही नातवाला कवडीचीही किंमत देत नाही, असे उद्गार काढते झाले होते. पार्थ पवार यांना पवारांनी एखाद्या झुरळ झटकावे तसे झटकून टाकले होते.

त्या सगळ्या घडामोडीचा अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना राग येणे स्वाभाविक होते, पण तेही दोन्ही राजकीय नेते असल्याने त्यांनी तो राग त्यावेळी मनात ठेवला, पण नंतर बारामतीच्या कऱ्हा नदीतून बरेच “राजकीय पाणी” वाहून गेले अजितदादा भाजप बरोबर आले आणि ती लढाई आता काका विरुद्ध पुतण्या अशी थेट बारामतीच्या मैदानात रंगली. त्यावेळी पवार आपल्याच सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना “बाहेरून आलेली पवार” असे म्हणून बसले. धाराशिवच्या पाटलांची जी मुलगी पवारांनी वाजत गाजत बारामतीच्या घरात सून म्हणून आणली होती, ती लोकसभेच्या मैदानात उतरल्याबरोबर “बाहेरून आलेली पवार” ठरली. पण पवारांकडून सुळेंच्या घरात गेलेली मात्र “मूळची पवार” ठरली!!

पवारांची मूळ भूमिका प्रतिगामीच

पवारांचे सगळे धोरण असेच आहे. जोपर्यंत आपले सगळे राजकारण साधून जाते, तोपर्यंत पवारांची सामाजिक भूमिका पुरोगामी असते. किंबहुना पवार म्हणतील ती भूमिका “पुरोगामी” आणि ते म्हणतील ती भूमिका “प्रतिगामी” ठरत असते, मग पवारांच्या समर्थकांनी पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली, तर ते त्यांना चालते. पण इतर कोणीही शिवाजी महाराजांबद्दल कुठले वेगळे वक्तव्य केले, तर हेच पवार समर्थक त्या व्यक्तीवर मात्र आवेशाने तुटून पडतात. त्यावेळी पवार संतुलित भूमिका घेण्यापेक्षा मूग गिळून गप्प राहणे पसंत करतात!!

पवारांचे “संस्कार”

एरवी सुप्रिया सुळे माझ्यावर प्रतिभा पवार आणि शरद पवार या आई-वडिलांचे संस्कार आहेत, मी यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढली आहे, अशा गप्पा मारत राजकारणात मुशाफिरी करत असतात, पण जेव्हा स्वतः पवारच सुनेला “बाहेरून आलेली पवार” असे म्हणतात, त्यावेळी मात्र सुप्रिया सुळे “पवारांच्या संस्कारा”नुसार मूग गिळून गप्प बसतात, हा आत्ताच अनुभव आहे. पवारांनी नातवाला कवडीची किंमत दिली नव्हती, तेव्हाही सुप्रिया सुळे काही बोलल्या नव्हत्या आणि आजही “बाहेरून आलेल्या पवार” या वक्तव्यावर सुप्रिया सुळे अजून तरी काहीही बोललेल्या नाहीत!!

Sharad pawars original regressive social approach for his ambitions

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात