निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात “मणिपूर” घडण्याची पवारांच्या तोंडी भाषा; हा इशारा, की कुणाला “हिंट”??


नाशिक : मनोज जरांगे यांनी ओबीसींमधूनच मराठा समाजाला आरक्षण मागण्याची हट्ट धरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणचा वाद उफाळून गावागावांमध्ये अविश्वासाचे आणि परस्पर विरोधी वातावरण तयार झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी नवी मुंबईमधील जाहीर सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार होईल की काय!!, अशी भीती वाटत असल्याचे वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. Sharad pawar and riots an old political relations

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांसारख्या ज्येष्ठतम नेत्याने महाराष्ट्रामध्ये शांतता टिकून राहण्याची वक्तव्ये करण्याऐवजी थेट “मणिपूर” घडण्याची शक्यता व्यक्त केल्याने पवारांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा तो इशारा दिला आहे की अन्य कुणाला काही “हिंट” दिली आहे??, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मणिपूरविषयक धोरणावर भाष्य केले. मणिपूर जळत असताना मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता वाटते. मणिपूरमध्ये जे घडलं, तेच आपल्या आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झाला आहे. मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा, असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही, असा गंभीर आरोप पवारांनी केला, पण त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर मणिपूर घडेल असे वक्तव्य केल्याने मोठ्या शंका निर्माण झाल्या.

पवार आणि दंगल निकटचा संबंध

तसेही पवारांची सत्ता आणि दंगल याचे जवळचे राजकीय नाते आहे. मुंबईत 1990 च्या दशकामध्ये प्रचंड अस्वस्थता होती. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येमध्ये संतप्त कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचे पडसाद मुंबईत उमटले. 1993 च्या सुरवातीलाच जिहादी दंगलखोरांनी मुंबईत मोठे दंगल घडवली होती. दाऊद सारख्या गँगस्टरने बॉम्बस्फोट घडवून आणले. मुंबईत उसळलेली दंगल त्यावेळच्या सुधाकरराव नाईक सरकारला आटोक्यात आणता आली नाही, असा ठपका ठेवत सुधाकरराव नाईक यांना बाजूला करण्याचा घाट पवारांनी घातला होता. कारण दंगलीच्या विषयापेक्षा सुधाकरराव नाईक यांनी पवारांचे समर्थक गुंड हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सुधाकरराव नाईक यांच्यावर पवारांचा तो खरा राग होता. म्हणूनच नाईकांना बाजूला करून आपले समर्थक पद्मसिंह पाटलांना मुख्यमंत्री पदावर बसवण्याचा पवारांचा डाव होता.



पण तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी पवारांचा तो डाव ओळखला आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदावरून बाजूला करताना पवारांच्या बाकी कुठल्याही समर्थकाला नव्हे, तर खुद्द शरद पवारांनाच देशाच्या संरक्षण मंत्री पदावरून बाजूला करून महाराष्ट्रात मुख्यमंत्री करून पाठवले होते. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर बसून पवारांना दंगल आणि नंतरचे बॉम्बस्फोट यातून मार्ग काढावा लागला होता. परंतु त्यात त्यांच्यावर दंगल घडविण्याचा आणि दाऊदला आश्रय देऊन त्याला पाकिस्तानात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप झालाच होता. याच बॉम्बस्फोटाच्या वेळी एक बॉम्बस्फोट मशिद बंदरा जवळ झाला असे पवार खोटे बोलले होते. त्याचे ते आजही समर्थन करतात. पण 1993 मध्ये पवारांवर दंगल घडविण्याचा ठपका बसल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली अखंड काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रातून गेली होती.

त्यामुळे पवारांनी आत्ता 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मणिपूर सारखे दंगल घडण्याची भाषा केली. यात नवीन काही नाही. त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा दंगलीशी आणि तिच्या कट कारस्थानांशी निकटचा संबंध असल्याचा इतिहास आहेच आणि तो फार लांबचा नाही, तो 1990 च्या दशकातला आहे. त्यामुळेच पवारांनी महाराष्ट्रात मणिपूर घडेल हा इशारा दिला आहे, की कुणाला “हिंट” दिली आहे??, असा सवाल तयार झाला आहे.

युक्रेनला जाण्याआधी मणिपूरला जाऊन या!!

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने मणिपूरची आठवण करुन देत निशाणा साधला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोदींवर निशाणा साधला.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीमध्ये हजेरी लावली होती. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. मणिपूरच्या लोकांचा साधा प्रश्न इतका आहे की, एन. बिरेन सिंह यांनी पंतप्रधान मोदींची एकट्यात भेट घेऊन मणिपूरमधील परिस्थितीबद्दल चर्चा केली का??, 3 मे 2023 पासून मणिपूर धगधगत आहे. बिरेन यांनी नरेंद्र मोदींना मणिपूरला भेट देण्याचं निमंत्रण दिलं का?? युक्रेनला जाण्यापूर्वी मणिपूरला या असं त्यांनी सांगितलं का??, असा सवाल जयराम रमेश केला.

पण पवारांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात मणिपूर घडेल, अशी “हिंट” दिल्याबद्दल जयराम रमेश यांनी चकार शब्दही काढला नाही.

Sharad pawar and riots an old political relations

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात