Raj Thackeray : पुतण्याचा चुलत काकाला काटशह; आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर!!

राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा संजीवन मेळाव्यात अयोध्या दौरा जरूर जाहीर केला, पण त्याची तारीख सांगितली नाही. पण आता या आपल्या चुलत काकाला काटशह देण्यासाठी पुतण्या तारीख जाहीर करून आयोध्या दौरा करणार आहे. Raj Thackeray: nephew’s cousin Katshah; Aditya Thackeray’s visit to Ayodhya announced !!

– रामराज्याचा संकल्प

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक मधून जाहीर केला आहे. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला जातील आणि महाराष्ट्रातल्या रामराज्याचा संकल्प करतील, असे संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे हा विषय लावून धरल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ माजली. शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांच्याकडून कायमचा हिरावून घेण्याच्या दृष्टीने राज ठाकरे यांची पावले पडत चालल्याचे पाहताच शिवसेना खडबडून जागी झाली आहे. महाविकास आघाडीचे कथित धर्मनिरपेक्ष धोरण आणि शिवसेनेचे हिंदुत्व यात परस्पर विरोध असताना जी तारेवरची कसरत करावी लागते, त्यातून शिवसेना बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहे. आणि त्यातूनच जेव्हा राज ठाकरे यांनी मशिदींवरवरच्या भोंग्यांचा मुद्दा उचलून आपली प्रखर हिंदुत्वाची दिशा स्पष्ट केली, तेव्हा शिवसेनेला जागे होण्यावाचून पर्याय उरला नाही.



– मनसेमुळे खडबडून जागी शिवसेना

आता शिवसेनेने जागे होऊन आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात आयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर जरूर केले, पण त्यांनी तारीख जाहीर केली नव्हती. ठाण्यातल्या उत्तर सभेत देखील त्यांनी अयोध्या दौर्‍याची तारीख सांगितली नाही. नेमका याच गोष्टीचा फायदा उचलत आदित्य ठाकरे यांनी आयोध्या दौरा निश्चित करण्याचे ठरवले. मूळात नाशिक जिल्हा आणि शहर शिवसेनेने अयोध्या दौरा आधीच ठरवला होता. त्यात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाची भर घालून संजय राऊतांनी तो दौरा महाराष्ट्रव्यापी असल्याचे जाहीर केले. मग त्याला महाराष्ट्रात रामराज्य आणण्याची पुस्ती जोडण्यात आली. यातून एकच राजकारण स्पष्ट झाले, ते म्हणजे आपल्या चुलत काकाला काटशह देण्यासाठी पुतण्या आयोध्या दौऱ्यावर जात आहे.

– भाजपला इशारा, पण राजन आकाश

आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर करताना अयोध्या आमच्यासाठी नवीन नाही. अयोध्येत आम्ही पाहुणे नाही. अयोध्या नेहमीच आमचे स्वागत करते, अशी एकापाठोपाठ एक वक्तव्ये संजय राऊत यांनी केली आहेत. यातून भाजपला काय मिळायचा तो काटशह मिळेल तो मिळो, पण त्याहीपेक्षा हा राज ठाकरे यांच्या तारीख न जाहीर केलेल्या अयोध्या दौऱ्याला काटशह आहे, हेच आदित्य ठाकरे यांच्या तारीख जाहीर झालेल्या आयोध्या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे.

Raj Thackeray : nephew’s cousin Katshah; Aditya Thackeray’s visit to Ayodhya announced !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub