राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात हनुमान चालिसा पठण


पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चाैक मारुती मंदिर येथे हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे. In the presence of Maharashtra Navanirman Sena leader Raj thakare Hanuman chalisa pathan in pune’s Hanuman tempal


विशेष प्रतिनिधी

पुणे : मशिदीवरील अजनाच्या भाेंग्यावरुन आवाज उठवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदर भाेंगे काढण्याबाबत अल्टीमेटम दिल्याने राज्यभरात राजकीय वादंग निर्माण झाला आहे. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावरील खालकर चाैक मारुती मंदिर येथे हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे.

शनिवारी राज ठाकरे पुण्यात दाखल हाेणार असून ते खालकर चाैक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सवाचे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने माेठया प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यासाेबतच कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु केली आहे.



राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी नेत्याची प्रतिमा तयार करण्यासाठी पाेस्टरवर ठाकरे यांना ‘हिंदुजननायक’ अशी उपाधी लावून भगव्या शालीतील टिळाधारी राज ठाकरेंचा फाेटाे बॅनरवर लावण्यात आला आहे. मागील दीड शतकासानू खालकर मारुती मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान राहिले आहे. हे मंदिर जुने झाल्यामुळे व एका अपघातात मंदिराची भिंत पडल्यामुळे २० वर्षापूर्वी मंदिराच्या बांधकामाची सुरुवात राज ठाकरे यांच्या हस्ते झाली हाेती. मंदिरात नित्यनियमाने पूजाआर्च्या, हाेमहावन, धार्मिक विधी पार पडत असतात. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे व दुसऱ्यादिवशी महाप्रसादाचे आयाेजन ही करण्यात आले आहे.

In the presence of Maharashtra Navanirman Sena leader Raj thakare Hanuman chalisa pathan in pune’s Hanuman tempal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात