मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरची सभा अजून व्हायची व्हायची आहे. ते अजून बोलायचे आहेत. तरी प्रत्यक्ष सभेपेक्षा आणि राज ठाकरे यांच्या सभेतल्या भाषणापेक्षा सभेच्या अटी शर्तींची परवानगीच्या घटनाक्रमाची आणि 15000 च्या गर्दीची चर्चाच जास्त सुरू आहे. राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याची किंवा उत्तर सभेची आधी चर्चा जेवढी रंगली नव्हती, तेवढी किंबहुना त्यापेक्षा अधिकची चर्चा संभाजीनगरच्या सभेची होताना दिसते आहे. यामध्ये पोलिसांनीही परवानगी नाट्य रंगवून सगळेच्या प्रसिद्धीत भर घातली आहे…!!
पण त्या पलिकडे जाऊन पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी ज्या अटी शर्ती घातल्या आहेत, त्या बारकाईने वाचल्या तर या चर्चेचे खरे रहस्य लक्षात येईल. पोलिसांनी म्हणे फक्त 15000 लोकांना बोलण्याची परवानगी दिली आहे. जाहीर सभेत अशी विशिष्ट संख्येने लोकांना बोलवण्याची पद्धत असते…?? भले पोलिसी कायद्याच्या भाषेत डोकी मोजण्याची ती प्रथा असेल, पण जाहीर सर्वांची वर्णने मात्र “हजारोंची सभा”, “लाखोंची सभा”, “रेकॉर्डब्रेक सभा”, अशीच होत आलेली आहेत.
पूर्वी तर लोकांना जमिनीवर सतरंजी टाकून बसायची सोय केली जायची. म्हणून तर कार्यकर्त्यांना सतरंजी टाकणारे आणि स्टेजवर खुर्चीत बसणारे अशी विभागणी करून हिणवले जायचे. पण त्यावेळी एका व्यक्तीला बसायला किती जागा लागते?? त्यानुसार ते मैदान किती मोठे आहे??, मग त्यावर आधारित सर्वसाधारण आकडा काढला जायचा. तो आकडा काढण्यात त्यावेळेच्या वर्तमानपत्रांना जास्त रस असायचा. त्यामुळे बाळासाहेबांच्या गर्दीच्या सभांची वर्णने वर्तमानपत्राचे येताना “लाखोंची सभा” “रेकॉर्डब्रेक सभा” अशी यायची… पण प्रत्येक वर्तमानपत्राचे आकडे वेगवेगळे असायचे. त्यातले “लाखोंची सभा” हे वर्णन कॉमन असायचे…!! बाळासाहेबांच्या सभेला खरंच प्रतिसाद प्रचंड मिळायचा ही वस्तुस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर मग राज ठाकरे यांच्या संभाजीनगर सभेबाबत 15000 ची अट कशी काय घातली गेली असेल…??, हा प्रश्न पडतो. अर्थातच याचे उत्तर शिवसेना आणि मनसे यांच्या सभांच्या गर्दीत गर्दी खेचण्याचा क्षमतेत दडलेले दिसते. बाळासाहेब ठाकरे यांची सभा ज्या संभाजीनगरच्या मैदानावर व्हायची त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार आहे.
ही सभा जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांची काय सभा व्हायची ती होऊ देत, पण बाळासाहेबांच्या सभेला तोड नाही. ते रेकॉर्ड कोणीच तोडू शकणार नाही, असे आधीच जाहीर करून टाकले होते. आता जर राज ठाकरे यांची सभा खरच “रेकॉर्ड तोड” झाली तर थेट बाळासाहेबांनंतरचा सभेची गर्दी खेचणारा मोठा नेता म्हणून राज ठाकरे यांची प्रतिमा मनसैनिक तयार करतील, ही भीती शिवसेनेला वाटते आहे आणि म्हणून मग पोलिसांच्या परवानगीतच 15000 ची अट घालून शिवसेनेने राजकीय मेख मारून ठेवली आहे…!!
आता मनसैनिकांनी “रेकॉर्ड तोड” सभेचे कितीही दावे केले तरी शिवसैनिक मात्र पोलिसांच्या 15000 च्या अटीनुसार सभा 15000 चीच झाली असे म्हणायला मोकळे होतील. हे ते खरे म्हणजे 15000 च्या आकड्याचे रहस्य आहे…!! पण शिवसैनिक शिवसेनेच्या माध्यमातूनही ते उघड बोलू शकत नव्हते म्हणून मग पोलिसी परवानगीच्या अटी-शर्ती मध्ये 15000 चा आकडा घालून शिवसेनेच्या नेतृत्वाने ती “सोय” करून घेतल्याचे दिसते आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात सभा मोठ्या होतात. ते मैदान भरवण्याची क्षमता फार कमी नेत्यांकडे आहे. आधी बाळासाहेब ठाकरे होते, आता राज ठाकरे आहेत ही वस्तुस्थिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App