भोंगे हटविल्याने आभार, राज ठाकरे यांनी केले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तर प्रदेश सरकारने 30 एप्रिलपर्यंत बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले. योगी सरकारच्या या कारवाईचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतूक केले आहे.Raj Thackeray thanked Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath for removing the loudspeaker

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ”उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदिंवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असे त्यांनी पत्रकात म्हटलं.



राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलाही तेढ निर्माण करायचा नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.

Raj Thackeray thanked Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath for removing the loudspeaker

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात