विनायक ढेरे
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्रातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला कडवे आव्हान उभे करण्यासाठी सर्व विरोधक एकमेकांना जरूर भेटत आहेत. नवे नवे संकल्प करत आहेत, पण पंतप्रधान पदाची गाठ मात्र सुटायला या भेटीतून तयार नाही!!Opposition parties leaders meeting each other, but couldn’t find fit prime ministerial candidate
ममता बॅनर्जींनी सोडले प्रयत्न
सहाच महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी दिल्ली दौरा करून विरोधकांची मोट बांधण्याचा निकराचा प्रयत्न करून पाहिला होता. सर्व विरोधकांनी त्यांना तोंडी प्रतिसाद देखील दिला होता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी आदी नेत्यांनी त्यांना तोंडी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण ममतांनी सहा महिन्यांपूर्वी खाल्लेली उचल नंतर मात्र खाली बसली. राष्ट्रपतीपराच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन टाकला. तेव्हापासून ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत.
के. चंद्रशेखर राव अधिक आक्रमक
त्यांच्या ऐवजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. राव यांनी महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट तर घेतलीच, पण नुकतेच त्यांनी बिहारमध्ये जाऊन नितीश कुमार यांची भेट घेतली होती. तेव्हा पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरच्या प्रश्नावर नितीश कुमार पत्रकार परिषदेतून उठून निघून चालले होते. पण राव यांनी त्यांना आग्रह करून बसवून ठेवले होते.
श्री @NitishKumar जी से अपने कार्यालय में मिल कर अच्छा लगा। इन्होंने जो प्राथमिकता गिनाईं – उससे हम और सभी भारतीय देश-भक्त सहमत होंगे – भारत को आज़ाद, सही तौर पर लोकतांत्रिक, सभी नागरिकों को एक जुट और समान स्थान देने के लिए, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक दलों और शक्तियों को साथ लाना pic.twitter.com/F7m9etS9x3 — Sitaram Yechury (@SitaramYechury) September 6, 2022
श्री @NitishKumar जी से अपने कार्यालय में मिल कर अच्छा लगा। इन्होंने जो प्राथमिकता गिनाईं – उससे हम और सभी भारतीय देश-भक्त सहमत होंगे – भारत को आज़ाद, सही तौर पर लोकतांत्रिक, सभी नागरिकों को एक जुट और समान स्थान देने के लिए, धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक दलों और शक्तियों को साथ लाना pic.twitter.com/F7m9etS9x3
— Sitaram Yechury (@SitaramYechury) September 6, 2022
विरोधकांची चाचपणी एकमेकांचा “अंदाज”
शिवाय चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्र भेटीनंतर गोदावरीतून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन उद्धव ठाकरे बाजूला पडले आहेत. शरद पवार पुन्हा – पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा त्यांनी तोंडी तरी सोडून दिल्याचे दिसत आहे आणि आज जेव्हा नितीश कुमार डाव्या पक्षाचे नेते सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमार स्वामी यांना भेटले, त्यानंतर त्यांनी आपण स्वतः पंतप्रधान पदाचे उमेदवार नाही आणि तशी आपली इच्छाही नाही, असे तोंडी बोलून दाखवले आहे!!
याचा अर्थ असा की विरोधक सगळे विरोधक एकमेकांना जरूर भेटत आहेत. मोदींविरुद्ध आघाडी करण्याचे नवे नवे संकल्प सोडत आहेत… पण पंतप्रधान पदाच्या गाठी मात्र सोडायला कोणीच पुढे येत नाही. प्रत्येकजण सावध पवित्रा घेऊन आपापल्या उमेदवारी संदर्भात नुसतीच चाचपणी करताना दिसत आहे आणि “एकमेकांचा अंदाज” घेण्यातच विरोधक अद्याप मग्न आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App