मोदी परिवाराची राहुलने मारली कॉपी; ममतांनी हाणली चहावाल्याची कॉपी; मोदींना हरवायला विरोधकांना नव्या आयडियाही सुचू नयेत ना??

Opposition leaders loosely copying Modi's ideas to defeat him

नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी नव नवीन राजकीय शस्त्रे उपसायला हवी होती. त्या शस्त्रांचे आघात करून त्यांनी मोदी आणि त्यांच्या टीमला हैराण करायला हवे होते, पण प्रत्यक्षात घडले उलटेच!! केरळच्या वायनाड मध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या “मोदी का परिवार” या आयडियेवर डल्ला मारत वायनाड मध्ये “गांधी का परिवार” अशी कॉपी मारली, तर तिकडे पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडीत एका ठेल्यावर चहा बनवून ममता बॅनर्जींनी मोदींचीच चहावाल्याची कॉपी हाणली. त्यामुळे मोदींनीच वापरून गुळगुळीत केलेल्या फंड्यांच्या आधारे हे विरोधक मोदींना कसे काय पराभूत करू शकतील??, असा सवाल तयार झाला आहे. Opposition leaders loosely copying Modi’s ideas to defeat him

वास्तविक मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकापेक्षा एक निवडणूक रणनीतीकार खरेदी करून त्यांच्याकडून नव नव्या आयडिया घ्यायला हव्या होत्या. मोदी आणि त्यांच्या टीमची दुबळी बाजू कोणती??, त्यांच्यावर आघात करण्यासाठी कोणते नवे मुद्दे शोधून काढता येतील??, त्यांचे परिणाम किती होतील??, एकच एक मुद्दा शोधण्यापेक्षा अनेकविध मुद्दे शोधून मोदी आणि त्यांच्या टीमला विशिष्ट ठिकाणी टप्प्यात आणून त्यांची शिकार कशी करता येईल??, याचा विचार करायला हवा होता, पण तो विचार करणे तर सोडूनच द्या, मोदी विरोधातला साधा नॉर्मल प्रचार करण्यासाठी देखील हे “अतिबुद्धिमान” विरोधक मोदींच्याच आयडियाच्या कॉप्या करायला लागले.

मोदींना डिवचण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी मोदींना स्वतःचा परिवार आहे तरी कुठे??, असा खोचक सवाल केला होता. मोदी काँग्रेसच्या परिवारवादावर टीका करतात ना, म्हणून काँग्रेसवाले मोदींचा परिवार काढायला गेले. पण नंतर स्वतः तोंडावर पडले. कारण मोदींनी “मोदी का परिवार” ही सगळी समस्त भारतीय 140 कोटी जनता आहे, असा प्रचार चालवला. त्याचे सोशल मीडियावरून कॅम्पेन केले. भाजप कार्यकर्त्यांनी ते कॅम्पेन एवढे उचलून धरले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यापासून सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्याने स्वतःला मोदीचा परिवार म्हणून घेतले. मोदींचा परिवार एवढा विस्तृत झाला की त्यामुळे काँग्रेसवाले हैराण झाले!!

पण एवढे होऊन देखील राहुल गांधींना केरळच्या वायनाड मध्ये कोणतीही नवी आयडिया सुचली नाही. उलट त्यांनी “मोदी का परिवारची”च कॉपी वायनाड मध्ये मारली. वायनाड मध्ये मतदारांना संबोधित करताना ते म्हणाले, मी वायनाडच्या लोकांना मतदार म्हणून वागवत नाही. ते माझे बंधू – भगिनी आहेत वायनाड मधल्या प्रत्येक घरामध्ये माझे आई-वडील आणि बहिणी राहतात. मी त्यांच्या आणि ते माझ्याच परिवाराचा हिस्सा आहेत. त्यामुळे वायनाडच्या जनतेमध्ये आपल्याविषयी सहानुभूती आणि आपुलकी निर्माण होईल, असा राहुल गांधींचा होरा होता. परंतु प्रत्यक्षात आपण “मोदी का परिवार” या आयडियेची कॉपी करतो आहोत, याचे भान राहुल गांधींना उरले नाही.

इकडे राहुल गांधींची वायनाड मधली ही स्टोरी, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची जलपाईगुडीत वेगळीच स्टोरी रंगली. पश्चिम बंगाल मधल्या चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ममता बॅनर्जी त्या परिसरात पोहोचल्या. तिथे अनेक नागरिकांना भेटल्या. त्यांना मदत केली. गावागावांमध्ये त्यांनी भेटीगाठी घेतल्या. या निमित्ताने त्यांनी लोकसभेचा प्रचार करून घेतला, पण त्या पलीकडे जाऊन काही वेगळी आयडिया लढवण्याऐवजी ममता बॅनर्जी सारख्या मुरब्बी नेत्याने देखील मोदींची चहावाल्याची कॉपी हाणली.

वास्तविक मोदी आणि चहावाला हे समीकरण देखील काँग्रेसवाल्यांनीच “फिट” केले होते. सावरकर अपमान फेम काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चहावाला म्हणून हिणवले. त्यांना काँग्रेसच्या अधिवेशनात एखादा चहाचा स्टॉल टाकून देण्याची गर्जना केली होती, पण मोदींनी त्या गर्जनेचे रूपांतर आपल्या विजयी घोषणेत करून टाकले होते. मी आहेच चहावाला. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो कष्ट केले आणि प्रगती साधली, असा प्रचार करण्याची संधी मोदींनी साधली. त्यामुळे देशात “चहावाला” नावाचा एक स्वतंत्र ब्रँड तयार झाला. देशातले छोटे व्यवसायिक देखील अभिमानाने मिरवू लागले. हे सगळे मोदींच्या नावावर राजकीय दृष्ट्या खपले.

आता विरोधकांनी मोदींवर मात करण्यासाठी काही नवी आयडिया लढवावी ना…, पण नाही. ममता बॅनर्जी सारख्या मुरब्बी नेत्याने देखील मोदींची चहावाल्याची कॉपी हाणली. जलपाईगुडी मध्ये त्या एका ठेवल्यावर गेल्या आणि तिथल्या स्टोव्ह वर स्वतःच्या हाताने चहा बनवला. तो बनवून त्यांनी कागदी ग्लास मध्ये ओतला आणि सगळ्यांना सर्व्ह केला. ही मोदींच्या चहावाल्याची कॉपी ठरली. विरोधकांना मोदींचा पराभव करण्याची जबरदस्त ईर्षा आहे, पण त्यांना नव्या आयडिया सुचत नाहीत, हेच राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींच्या आजच्या कृतीतून दिसून आले!!

Opposition leaders loosely copying Modi’s ideas to defeat him

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात