नाशिक : Manoj Jarange मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांची सहाव्या उपोषणाच्या सातव्या दिवशी तब्येत खालावली ती बघण्यासाठी संभाजीराजे अंतरवली सराटीत पोहोचले. तिथून त्यांनी एकाच वेळी सरकार आणि सध्याचे विरोधक म्हणजे महाविकास आघाडी यांना दोष देत मनोज जरांगेंना काही झाले, तर तुमची जबाबदारी असा इशारा दिला. त्याचवेळी मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देत त्यांना तिसऱ्या आघाडीत येण्याचे आवाहन केले.
ही वरवर पाहता साधी राजकीय घडामोडी वाटत असली, तरी मनोज जरांगे यांची तिसऱ्या आघाडीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एंट्री म्हणजे शरद पवारांच्या निवडणुकीनंतरच्या पुलोद प्रयोगाची नांदी असेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. Manoj Jarange
मनोज जरांगे, संभाजीराजे किंवा मराठा आरक्षणाची मागणी करणारे वेगवेगळे घटक हे कुठे ना कुठेतरी शरद पवारांशी संलग्न आहेत, ही बाब लपून राहिलेली नाही. संभाजीराजे हे तर एकेकाळी पवारांच्या अखंड राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे लोकसभेचे उमेदवार होते. परंतु त्यांना 2009 च्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर अपयश आले. त्यानंतर त्यांनी भाजपशी संधान साधून राष्ट्रपती नियुक्त खासदारकी मिळवली होती. तिची मुदत संपताना मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेत संभाजीराजेंनी टप्प्याटप्प्याने भाजपविरोधी भूमिका घेत स्वराज्य संघटनेची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. त्या संघटनेला स्वतंत्र राजकीय डूब आहे असे भासविले, पण शाहू महाराजांनी कोल्हापुरातून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवायची घोषणा करताच संभाजीराजेंनी स्वराज्य पक्ष संघटना बाजूला ठेवून काँग्रेसचा म्हणजेच पर्यायाने महाविकास आघाडीचाच प्रचार केला. शाहू महाराज काँग्रेसचे खासदार झाले.
त्यानंतर चलाखीने संभाजीराजेंनी पुन्हा स्वराज्य पक्ष संघटनेची कास धरत तिसरी आघाडी स्थापन करून महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेतली. तिच्यात मनोज जरांगे यांच्या एंट्रीच्या बेरजेचे राजकारण करून तिसऱ्या आघाडीची व्होट बँक उभारणी करण्याचा प्रयत्न चालविला. यातून महायुतीच्या, त्यातही प्रामुख्याने भाजपच्या विरोधात मतांचे ध्रुवीकरण करणे हा मुख्य हेतू असल्याचे लपून राहिलेले नाही.
Manoj Jarange : तिसऱ्या आघाडीतले नेते संभाजीराजे मनोज जरांगेंच्या भेटीला; आता सरकारसकट विरोधी पक्षांनाही दिला इशारा!!
तसेही महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी महाराष्ट्रात लढत झाली, तरी निवडणुकीच्या निकालानंतर जी आघाडी किंवा युती तयार होईल, ती सत्तेवर येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. किंबहुना तशा दोन्ही बाजूंनी गंभीर राजकीय हालचाली आणि डावपेच सुरू आहेत. Manoj Jarange
शिंदे + अजितदादा + पवार + ठाकरे + तिसरी आघाडी + मनसे + वंचित = 2024 पुलोद प्रयोग!!
अशा स्थितीत तिसऱ्या आघाडीतील निवडून येणारी आमदार संख्या महत्त्वाची ठरू शकते. काँग्रेस आणि भाजप यांना दूर ठेवून उरलेल्या सगळ्यांना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा वगळून उरलेली अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि तिसरी आघाडी, जमलेच तर मनसे आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित मोट बांधून 2024 चा पुलोद प्रयोग महाराष्ट्रात करण्याचा पवारांचा इरादा असू शकतो. अर्थात हे सगळे आमदारांच्या संख्याबळावर अवलंबून आहे. यासाठीच तिसऱ्या आघाडीचे राजकीय भांडवलीकरण सुरू असून सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून मनोज जरांगे यांच्याकडे पवार पाहात असतील, तर त्यात महायुतीसाठी तो सावधगिरीचा इशारा असेल. पण यात काँग्रेस किंवा भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांपैकी एकाने जरी 70 ते 80 हा आमदारांचा आकडा गाठला, तर पवारांच्या 2024 चा पुलोद प्रयोगाचे सगळे मूसळ केरात जाण्याचाही संभव आहे. कारण मग तो पक्षच पवार वगळून पुलोद प्रयोग करण्याची शक्यता आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App