अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग… हे नाव 2023च्या सुरुवातीपासून जगभरातील प्रत्येकाच्या ओठावर रुळले आहे. या रिसर्च फर्मने जगातील टॉप-10 श्रीमंतांपैकी एक असलेले भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या साम्राज्याला जबरदस्त हादरा दिल्याने हे नाव भारतीयांच्या खासच परिचयाचे झाले आहे.The Focus Explainer How the Hindenburg Report Made, Who is the Biggest Earner Nathan Anderson? Read in detail
अदानींना या धक्क्यातून सावरण्यासाठी बराच वेळ लागेल. परंतु, अदानींचे प्रकरण थंड होण्यापूर्वीच नॅथन अँडरसनच्या नेतृत्वाखालील कंपनीने ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांची कंपनी ब्लॉक इंकबाबत अनेक खुलासे केले आहेत. आता अदानी समूहासारखीच डॉर्सी यांच्या कंपनीची स्थिती आहे. नॅथन अँडरसन कोण आहे आणि त्याची रिसर्च फर्म म्हणजेच संशोधन संस्था नेमकी कामे कशी करते हे तुम्हाला ठाऊक आहे का?
नॅथन अँडरसन आहेत सर्वेसर्वा
सर्व प्रथम हिंडनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसनबद्दल जाणून घेऊया. अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांचा शोध एका डेटा रिसर्च कंपनीच्या उंबरठ्यावर थांबला, तिथे अँडरसन यांना पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित संशोधनाचे काम मिळाले. काम करत असताना त्यांना डेटा आणि शेअर मार्केटमधील बारकावे कळले आणि शेअर बाजार हा जगातील भांडवलदारांचा सर्वात मोठा आधार आहे, हेही त्यांना इथेच उमगले.
विमान अपघातावर ठेवले फर्मचे नाव
काम करत असतानाच नॅथन अँडरसन यांना समजू लागले की शेअर बाजारात बरेच काही घडत आहे, जे सामान्य लोकांच्या समजण्यापलीकडचे आहे. येथूनच स्वत:ची संशोधन कंपनी सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या चुका उघडकीस आणून त्या शॉर्ट करायला सुरुवात केली. यावर पुढे जाऊन त्यांनी नोकरी सोडली आणि 2017 मध्ये हिंडेनबर्ग नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. मँचेस्टर टाउनशिप, न्यू जर्सी येथे 6 मे 1937 रोजी झालेल्या हिंडेनबर्ग एअरशिप अपघातावरून त्यांनी कंपनीचे नाव ठेवले आहे.
नेमके कशावर रिसर्च करते हिंडेनबर्ग?
नॅथन अँडरसन यांच्या हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेचे मुख्य काम शेअर बाजार, इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जवर संशोधन करणे आहे. या संशोधनाद्वारे, कंपनी शेअर बाजारात कुठे पैशांचा गैरवापर होत आहे का हे शोधून काढते. बड्या कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी अकाउंट्समध्ये फेरफार करत आहेत का? स्वतःच्या फायद्यासाठी, इतर कंपन्यांच्या शेअर्सवर चुकीच्या पद्धतीने सट्टा लावून कोणतीही कंपनी शेअर बाजाराचे नुकसान करत तर नाही ना? या सर्व मुद्यांवर सखोल संशोधन केल्यानंतर कंपनी सविस्तर अहवाल तयार करून प्रसिद्ध करते.
शॉर्ट सेलिंगमधून बक्कळ कमाई
हिंडनबर्ग ही एक गुंतवणूक फर्म तसेच शॉर्ट सेलिंग कंपनी आहे. कंपनीचे प्रोफाईल बघितले तर ते अॅक्टिव्हिस्ट शॉर्ट सेलर आहे. शॉर्ट सेलिंगद्वारे ते अब्जावधी रुपये कमावतात. आता प्रश्न असा आहे की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? तर ही एक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे. यामध्ये, एखादी व्यक्ती विशिष्ट किंमतीला स्टॉक किंवा सिक्युरिटीज खरेदी करते आणि नंतर किंमत जास्त असताना ती विकते, ज्यामुळे त्याला मोठा नफा मिळतो.
सोप्या शब्दांत सांगायचे तर, शेअर मार्केटमधील कोणताही गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स यासाठी खरेदी करतो की भविष्यात त्याची किंमत वाढू शकते. शेअर्सच्या किमती वाढल्या की तो त्या विकतो आणि नफा कमावतो. याउलट, शॉर्ट सेलिंगमध्ये शेअर्सची खरेदी-विक्री अशा वेळी केली जाते जेव्हा भविष्यात त्यांची किंमत कमी होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत शॉर्ट सेलर त्याच्याकडे शेअर्स नसतानाही त्यांची विक्री करतो. या पद्धतीत तो कंपनीचे शेअर्स खरेदी-विक्री करत नाही, तर क्रेडिटवर विकतो. शॉर्ट सेलिंग हे बेकायदेशीर नाही, परंतु समभागांची खरेदी आणि विक्री करण्याचा एक पूर्णपणे कायदेशीर मार्ग आहे, तथापि त्यात जोखीम जास्त आहे.
जाणून घ्या, शॉर्ट सेलिंगचा खेळ
उदाहरणार्थ, एखाद्या शॉर्ट सेलरने 200 रुपयांचा स्टॉक भविष्यात 100 रुपयांपर्यंत घसरेल या आशेने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर. या आशेने तो या कंपनीचे शेअर्स इतर ब्रोकर्सकडून कर्ज म्हणून घेतो. हे केल्यानंतर, शॉर्ट सेलर हे कर्ज घेतलेले शेअर्स इतर गुंतवणूकदारांना विकतो, जे त्यांना फक्त 200 रुपयांना खरेदी करण्यास तयार असतात.
दुसरीकडे, अपेक्षेप्रमाणे जेव्हा कंपनीचा शेअर 100 रुपयांपर्यंत घसरतो, तेव्हा शॉर्ट सेलर त्याच गुंतवणूकदारांकडून शेअर्स खरेदी करतो. घसरणीच्या वेळी, तो 100 रुपयांच्या दराने शेअर विकत घेतो आणि ज्याच्याकडून त्याने कर्ज घेतले होते ते परत करतो. त्यानुसार त्याला प्रति शेअर 100 रुपये इतका मोठा नफा मिळतो. या रणनीतीद्वारे हिंडेनबर्ग ही अनेक कंपन्या शॉर्ट करून रग्गड कमाई करते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App